रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात १५० चाचण्या, सहा पॉझिटिव्ह

 अकोला,दि.११ (जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या १५० चाचण्या झाल्या त्यात सहा  जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

आज दिवसभरात अकोट येथे १७, बार्शी टाकळी येथे दोन, तेल्हारा येथे ३६, मुर्तिजापूर येथे सात, अकोला आयएमए येथे पाच, आरोग्य कर्मचारी ३८, हेडगेवार लॅब येथे तीन याप्रमाणे चाचण्या झाल्या. त्यात कुणीही पॉझिटीव्ह आले नाही. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ४२ चाचण्या झाल्या त्यात सहा जण पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यात २६ हजार ७३३ रॅपिड ॲन्टीजेन चाचण्या झाल्या त्यापैकी १८४९ पॉझिटीव्ह आले आहेत,  असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ