581 अहवाल प्राप्त; 34 पॉझिटीव्ह, 14 डिस्चार्ज, चार मृत्यू

 


अकोला,दि. 19(जिमाका)-आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 581 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 547 अहवाल निगेटीव्ह तर 34 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. दरम्यान चार रुग्णाचा उपचार घेतांना रुग्णालयात मृत्यू झाला आहे. तर 14 जणांना  डिस्चार्ज देण्यात आला आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.18) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये तीन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या  10116(8107+1832+177) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

            शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण  65923 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 64340 फेरतपासणीचे 270 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1313 नमुने होते. आजपर्यंत एकूण 65650 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 57543 तर पॉझिटीव्ह अहवाल 10116(8107+1832+177) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज 34 पॉझिटिव्ह

 आज दिवसभरात 34  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आज सकाळी 34 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात नऊ महिला व 25 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील कौलखेड व तेल्हारा येथील प्रत्येकी तीन, रणपिसे नगर, केडीया प्लॉट, जवाहर नगर व राम नगर येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित  मालेगाव, सिंधी कॅम्प, दिपक चौक, मूर्तिजापूर, तोष्णीवाल लेआऊट, मलकापूर, जठारपेठ, गोरक्षण रोड, चोहट्टा बाजार, खेडकर नगर, दहीहंडा ता. अकोट, राधाकिशन प्लॉट, मेहरबानू कॉलेज, एचडीओ ऑफिस, कृषी नगर, जुने राधाकिशन प्लॉट, आडगाव ता. तेल्हारा, वाशिम बायपास, केळकर हॉस्पिटल व अकोट येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही.

दरम्यान काल रात्री (दि.18)रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात तीन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

14 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून सात, आयकॉन हॉस्पीटल येथून एक, बिहाडे हॉस्पीटल येथून एक, ओझोन हॉस्पिटल येथून एक, युनिक हॉस्पिटल येथून एक,  सूर्यचंद्रा हॉस्पिटल येथून एक, हॉटेल स्कायलार्क येथून दोन, अशा एकूण 14 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे

चार मृत्यू

दरम्यान आज चार जणांचे मृत्यू झाले. त्यात पराड, ता. मूर्तिजापूर येथील 65 वर्षीय पुरुषाचा उपचार दरम्यान मुत्यू झाला. त्यांना 17 डिसेंबर रोजी दाखल करण्यात आले होते, मोठी उमरी येथील 82 वर्षीय पुरुषाचा उपचार दरम्यान मुत्यू झाला. त्यांना 9 डिसेंबर रोजी दाखल करण्यात आले होते तर नायगाव, अकोट फाईल येथील 54 वर्षीय पुरुषाचा उपचार दरम्यान मुत्यू झाला. त्यांना 9 डिसेंबर रोजी दाखल करण्यात आले होते. तसेच काल खाजगी हॉस्पिटल येथून एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण किर्ती नगर, गोरक्षण रोड, अकोला येथील 72 वर्षीय महिलाचा उपचार दरम्यान मुत्यू झाला त्यांना 12 डिसेंबर रोजी दाखल करण्यात आले होते.

756 रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 10116(8107+1832+177) आहे. त्यातील 310 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 9050 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 756 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ