रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात ९८ चाचण्या,तीन पॉझिटिव्ह

 अकोला,दि.२६ (जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या ९८ चाचण्या झाल्या त्यात तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

आज दिवसभरात बाळापूर येथे चार, बार्शीटाकळी येथे  १८, तेल्हारा येथे नऊ, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या २६ तर हेडगेवार प्रयोगशाळा येथे तीन चाचण्या झाल्या त्यात कुणीही  पॉझिटीव्ह आले नाही. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २४ चाचण्या होऊन दोन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तर अकोट येथे  सात जणांच्या चाचण्या होऊन एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यात २८ हजार ४३३ रॅपिड ॲन्टीजेन चाचण्या झाल्या त्यापैकी १९१५ पॉझिटीव्ह आले आहेत,  असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ