581 अहवाल प्राप्त; 33 पॉझिटीव्ह, 48 डिस्चार्ज, एक मयत

 


अकोला,दि. 22(जिमाका)-आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 581 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 548 अहवाल निगेटीव्ह तर 33 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. दरम्यान एका रुग्णाचा उपचार घेतांना रुग्णालयात मृत्यू झाला आहे. तर 48 जणांना  डिस्चार्ज देण्यात आला आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.21) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये एक जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या  10218(8198+1843+177) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

            शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण  66918 जणांचे  पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 65323 फेरतपासणीचे 271 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1324 नमुने होते. आजपर्यंत एकूण 66813 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 58615 तर पॉझिटीव्ह अहवाल 10218(8198+1843+177) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज 33 पॉझिटिव्ह

 आज दिवसभरात 33  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आज सकाळी 31 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात नऊ महिला व 22 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील मोठी उमरी येथील चार, अमानका नगर, जठारपेठ, जवाहर नगर, मोठी उमरी व जुने शहर येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित रिजेन्सी अपार्टमेंट, जगजीवन रामनगर, तेल्हारा, श्रद्धा रेसिडेन्सी, सहकार नगर, मलकापूर, बालाजी नगर, सिंधी कॉलनी, रतनलाल प्लॉट, बेलखेड, नुर नगर, रणपिसे नगर, बिर्ला रोड, रघुनंदन सोसायटी, शिवर, निमकर्दा व गायगाव येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी  दोघांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात दोन महिलांचा समावेश असून ते तेल्हारा व पारद ता. मुर्तिजापूर येथील रहिवासी आहे.

दरम्यान काल रात्री (दि.21)रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात एक जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

48 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून दोन, आयकॉन हॉस्पीटल येथून सहा, बिहाडे हॉस्पीटल येथून तीन तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले 37, अशा एकूण 48 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे

एकाचा मृत्यू

दरम्यान आज एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण संभाजी चौक, ता. तेल्हारा येथील 71 वर्षीय पुरुष असून तो दि. 15 डिसेंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला.

771 रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 10218(8198+1843+177) आहे. त्यातील 312 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 9135 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 771 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ