अल्पसंख्याक हक्क दिन अल्पसंख्याकांच्या विकास योजना राबविण्यासाठी कृती आराखडा तयार करा- जिल्हाधिकारी पापळकर यांचे निर्देश




            अकोला,दि. 18(जिमाका)- अल्पसंख्याक समाजाच्या विविध घटकांच्या विकासासाठी  अनेक शासकीय योजना आहेत. या योजना प्रभावीपणे प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवून  त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कृती आराखडा तयार करुन त्यांच्यापर्यंत योजनाचा लाभ पोहोचवावा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज येथे दिले.

            जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात आज अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी  ॲड. परवेज डोकाडिया यांनी ‘भारतीय संविधानात अल्पसंख्याकांचे अधिकार व कर्तव्य’ या विषयावर मार्गदर्शन केले.  यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, विशेष कार्यकारी अधिकारी प्रकाश अंधारे, उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाढवे, सदाशिव शेलार, विश्वनाथ घुगे, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिक्षक मिरा पागोरे व जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

            कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी तर आभार प्रदर्शन मिरा पागोरे यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ