745 अहवाल प्राप्त; 58 पॉझिटीव्ह, 36 डिस्चार्ज


अकोला,दि. 17(जिमाका)-आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 745 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 687 अहवाल निगेटीव्ह तर 58 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले.  तर 36 जणांना  डिस्चार्ज देण्यात आला आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.16) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये चार जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या  10042(8044+1821+177) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

            शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण  64665 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 63098 फेरतपासणीचे 265 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1302 नमुने होते. आजपर्यंत एकूण 64501 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 56457 तर पॉझिटीव्ह अहवाल 10042(8044+1821+177) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज 58 पॉझिटिव्ह

 आज दिवसभरात 58  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आज सकाळी 30 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 14 महिला व 16 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील बिर्ला कॉलनी, कौलखेड, दुर्गा चौक, गोरक्षण रोड व आरोग्य नगर येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित धाबा ता. बार्शीटाकली, बार्शीटाकली, एमआयडीसी फेसll, कृष्णापर्ण कॉलनीबोरगाव मंजू, गजानन पेठ, न्यू राधाकिशन प्लॉट, गायत्री नगर, डाबकी रोड, संतोष नगर, मलकापूर, आळशी प्लॉट, तापडीया नगर, शिवाजी कॉलनी, मूर्तिजापूर, हातागाव ता. मूर्तिजापूर, गाडेगाव ता. मूर्तिजापूर, आदर्श कॉलनी, पारद ता. मूर्तिजापूर व गणेश नगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी  28 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 12 महिला व 16 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील तेल्हारा येथील आठ, गोरक्षण रोड, मलकापूर, राम नगर येथील प्रत्येकी तीन, व्हिबीएच कॉलनी, नागर ता. बाळापूर व मेहरबानू कॉलेज येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित रणपिसे नगर, सुधीर कॉलनी, अंजनगाव सूर्जीहिंगणा रोड, लेडी हा‍र्डींग येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.

दरम्यान काल रात्री (दि.16)रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात चार जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

36 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर आयकॉन हॉस्पीटल येथून आठ, सुर्यचंद्रा हॉस्पीटल येथून एक, बिऱ्हाडे हॉस्पीटल येथून तीन, हॉटेल स्कायलार्क येथून एक, तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले 23 जणांना, अशा एकूण 36 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

714 रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 10042(8044+1821+177) आहे. त्यातील 306 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 9022 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 714 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा