201 अहवाल प्राप्त; 26 पॉझिटीव्ह, 13 डिस्चार्ज, दोघांचा मृत्यू
अकोला,दि.2 (जिमाका)-आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 201 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 175 अहवाल निगेटीव्ह तर 26 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. दरम्यान आज दोन जणांच्या मृत्यूची नोंद झाली.
त्याच प्रमाणे काल (दि.1) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये सात जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 9491(7569+1745+177) झाली आहे.
आज दिवसभरात 13 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला,अशी माहिती शासकीय वैद्यकीय
महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत
एकूण 54735जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 53352 फेरतपासणीचे 250 तर
वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1133 नमुने होते. आजपर्यंत एकूण 54498 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 46929 तर पॉझिटीव्ह अहवाल 9491 (7569+1745+177)आहेत, अशी माहिती
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
आज 26 पॉझिटिव्ह
आज दिवसभरात 26 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात आज सकाळी
25 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात 11
महिला आणि 14 पुरुष आहेत. त्यात डाबकीरोड
येथील तीन जण, मलकापूर येथील तीन, गाडगेवाडी पातूर येथील दोन, कौलखेड येथील दोन, तर उर्वरीत खडकी, सिव्हील लाईन,महसूल कॉलनी, रतनलाल प्लॉट, लकडगंज, किनखेडपूर्णा,
व्यंकटेशनगर, संगलुड बीके, रणपिसेनगर,
गोरक्षण रोड, सांगवी खु, तेल्हारा,
पंचशिल नगर, कैलास टेकडी व बाळापूर येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहेत. आज
सायंकाळी एका रुग्णाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. हा रुग्ण तेल्हारा येथील पुरुष रुग्ण
आहे, अशी माहिती
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. दरम्यान काल (दि.1) रोजी रात्री रॅपिड ॲन्टीजेन टेस्ट मध्ये
सात जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांचाही समावेश आजच्या एकुण रुग्ण संख़्या
व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.
दोघांचा मृत्यू
दरम्यान आज दोन
मृत्यूची नोंद झाली आहे. हे दोघे रुग्ण
पुरुष असून त्यातील एकाचा हॉटेल रेजेन्सी येथील कोविड सेंटर मध्ये उपचारा दरम्यान
मृत्यू झाला. हा 56 वर्षीय रुग्ण जठारपेठ येथील असून दि. 13 नोव्हेंबर रोजी दाखल झाला होता. त्याचा
उपचारा दरम्यान दि.1 रोजी मृत्यू झाला. तर अन्य रुग्ण हा 45 वर्षीय असून अकोलखेड
ता. अकोट येथील रहिवासी आहे. हा रुग्ण दि.28 नोव्हेंबर रोजी दाखल झाला होता. त्याचा
आज उपचार घेतांना मृत्यू झाला.
13 जणांना डिस्चार्ज
आज दुपारनंतर आयकॉन हॉस्पिटल येथून तीन, ओझोन हॉस्पिटल येथून एक, स्कायलार्क हॉटेल
येथून दोन, बिहाडे हॉस्पिटल येथून
दोन, सूर्यचंद्र हॉस्पिटल येथून एक ,हॉटेल
रिजेन्सी येथून दोन तर शासकीय वैद्यकीय
महाविद्यालय येथून दोन अशा 13 जणांना डिस्चार्ज देण्यात आला,अशी माहिती
जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.
583 रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण
पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 9491(7569+1745+177)आहे. त्यातील 295जण मयत आहेत. डिस्चार्ज
दिलेल्या एकूण व्यक्तींची 8613 संख्या आहे. तर सद्यस्थितीत 583 पॉझिटीव्ह रुग्ण
उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य
चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा