५०० अहवाल प्राप्त; ४० पॉझिटीव्ह, ४० डिस्चार्ज

 अकोला,दि. २७(जिमाका)-आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे  ५०० अहवाल प्राप्त झाले. त्यातील ४६० अहवाल निगेटीव्ह तर ४० जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर ४० जणांना  डिस्चार्ज देण्यात आला आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.२६) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये तीन अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या  १०३७६ (८३३४+१८६५+१७७) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

            शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण  ६९०७३ जणांचे  अहवाल आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ६७४४० फेरतपासणीचे २७७ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १३५६ नमुने होते. आजपर्यंत एकूण ६८९५९ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ६०६२५ तर पॉझिटीव्ह अहवाल १०३७६ (८३३४+१८६५+१७७) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज ४० पॉझिटिव्ह

आज सकाळी ४० जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात २० महिला व २० पुरुष आहेत.  त्यातील माने एक्स रे आर.एल. टी. कॉलेजजवळ येथील सहा जण, कामा प्लॉट टॉवर चौक येथील पाच जण,  नवनीत अपार्टमेंट येथील तीन जण,  खडकी येथील दोन, आदर्श कॉलनी येथील दोन,  केशवनगर येथील दोन, तोष्णीवाल लेआऊट येथील दोन जण,  रजपुतपुरा येथील दोन,  सिंधी कॅम्प येथील दोन,  मलकापुर येथील दोन,  तर बार्शी टाकळी, गुलजारपुरा,  येळवण ता. अकोला,  विठ्ठल नगर,  न्यु देशमुख फाईल, चोहोट्टाबाजार,  स्वावलंबी नगर, शास्त्री नगर,  तुकाराम चौक,  मोरेश्वर कॉलनी,  गीतानगर, जुना राधाकिसन प्लॉट येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय रुग्णालय व जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्याकडून प्राप्त झाली आहे. आज सायंकाळी एकही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही.

दरम्यान काल (दि.२६) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यात तिघांचे अहवाल पॉझिटीव्ह आले असून त्यांचाही समावेश पॉझिटीव्ह रुग्ण संख़्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

४० जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून नऊ, बिहाडे हॉस्पिटल येथून दोन, आयकॉन हॉस्पिटल येथून तीन, स्कायलार्क येथून चार, सूर्यचंद्र हॉस्पिटल येथून एक, ओझोन हॉस्पिटल येथून  चार, हॉटेल रिजेन्सी येथून दोन तर होम क्वारंटाईन असलेल्या १५ जणांना अशा एकूण ४० जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

५२६ रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या १०३७६ (८३३४+१८६५+१७७) आहे. त्यातील ३१६ जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची ९५३४ संख्या  आहे. तर सद्यस्थितीत ५२६ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ