राष्ट्रीय ग्राहक दिन: नवीन ग्राहक कायदा जनसामान्यांपर्यंत पोहोचवा -अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे

 




            अकोला,दि.२४(जिमाका)- केंद्र शासनाकडून ग्राहकाचे सर्वोच्च हित जोपासणारा नवीन ग्राहक संरक्षण कायदा पारित करण्यात आला आहे. या कायद्यामुळे ऑनलाईन खरेदी व भ्रामक जाहिरातींव्दारे ग्राहकांच्या  होणाऱ्या फसवणूकीस आळा बसणार आहे. या नवीन कायद्याची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवून जनजागृती करा, असे निर्देश अपर  जिल्हाधिकारी अनिल खंडागळे  यांनी सबंधिताना दिले.

            अन्न नागरी पुरवठा व ग्राहक सरंक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने अपर जिल्हाधिकारी कार्यालयात ऑनलाईन वेबिनारव्दारे ‘राष्ट्रीय ग्राहक दिन’ निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी  ॲड. एस.एम. उंटवाले यांनी ग्राहक संरक्षण कायदा २०१९ नवीन स्वरुप या विषयावर मार्गदर्शन केले. कायद्यातील तरतुदी व ग्राहकांच्या ऑनलाईन व जाहिरातीव्दारे होणाऱ्या फसवणूकीबाबत मार्गदर्शन केले.

 यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी बी.यु. काळे, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष शिंदे, जिल्हा सुचना अधिकारी अनिल चिंचोले, राष्ट्रीय ग्राहक संरक्षण संघटनेचे अध्यक्ष संजय पाठक, पुरवठा निरीक्षक  संतोष कुटे व जिल्हा पुरवठा कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन निरीक्षक अधिकारी रविंद्र यन्नावार यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ