1114 अहवाल प्राप्त; 38 पॉझिटीव्ह, 45 डिस्चार्ज, एक मयत


अकोला,दि. 15(जिमाका)-आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 1114 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 1076 अहवाल निगेटीव्ह तर 38 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले.  दरम्यान एका रुग्णाचा उपचार घेतांना एका खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. तर 45 जणांना  डिस्चार्ज देण्यात आला आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.14) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये दोन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या  9928(7938+1813+177) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

            शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण  63194 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 61637  फेरतपासणीचे 263 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1294 नमुने होते. आजपर्यंत एकूण 62839 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 54901 तर पॉझिटीव्ह अहवाल 9928(7938+1813+177) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज 38 पॉझिटिव्ह

 आज दिवसभरात 38  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आज सकाळी 10 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात दोन महिला व आठ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील तोष्णीवाल लेआऊट  येथील दोन, तर उर्वरित  गोरक्षण रोड, मेन सिटी, यमुना संकुल, बार्शीटाकली, बाळापूर, वाशिम बायपास, देशमुख फैल व उजवलेश्वर ता. बार्शीटाकली येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी  28 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 15 महिला व 13 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील गोरक्षण रोड येथील पाच, गणेश नगर छोटी उमरी येथील चार, संतोष नगर व आळशी प्लॉट येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित पातूर, उरळ बु., अडोशी, बिर्ला राम मंदिर, जीतापूर खेडकर, रामटेक, जठारपेठ, आपातापा, बिर्ला कॉलनी, काळा मारोतीजवळ, न्यु राधाकिशन प्लॉट, आदर्श कॉलनी, मराठा नगर, गायत्री नगर व मलकापूर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे

दरम्यान काल रात्री (दि.14)रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात दोन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

एकाचा मृत्यू

दरम्यान आज खाजगी हॉस्पिटल येथे एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण भौरद, अकोला येथील 75 वर्षीय पुरुषाचा उपचार दरम्यान मुत्यू झाला. त्याला 11 डिसेंबर रोजी दाखल करण्यात आले होते.

45 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून सहा जण, आयकॉन हॉस्पीटल येथून पाचयुनिक हॉस्पीटल येथून एक, बिऱ्हाडे हॉस्पीटल येथून दोन, तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले 31 अशा एकूण 45 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

646 रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 9928(7938+1813+177) आहे. त्यातील 305 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 8977 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 646 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम