४३ हजारांची अवैध दारु जप्त; राज्य उत्पादन विभागाची कामगिरी; अकोला शहर व वाघजाळी ता.बार्शीटाकळी येथे धाडसत्र

 अकोला,दि.२४(जिमाका)- ग्राम पंचायत निवडणूक तसेच नाताळ व नववर्षाचे अनुषंगानेअवैध मद्यविक्रीस आळा घालण्यासाठी अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क, अकोला  या कार्यालयाकडून अकोला शहर व  वाघजाळी ता. बार्शीटाकळी  येथे विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमे अंतर्गत  आतापर्यंत आठ गुन्हे नोंदविण्यात आले असून सहा जणांना अटक करण्यात आली आहे. अद्याप पर्यंत ४३ हजारांचा मुद्देमाल  जप्त करण्यात आला असून हे धाडसत्र सुरु राहिल असे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिक्षक स्नेहा सराफ यांनी कळविले आहे.

अकोला शहरात व  वाघजाळी ता. बार्शीटाकळी याठिकाणी ही कारवाई आज करण्यात आली.  या विशेष मोहीममध्ये मुंबई दारूबंदी कायदा १९४९ च्या विविध कलमाखाली एकुण आठ गुन्हे नोंद करण्यात आले. या कारवाईत एकुण सहा आरोपीना अटक करून त्यामध्ये ३५.०८ लि. देशी दारू,हातभट्टी दारू २० लि. व १४०५ लि. मोहा रसायन असा एकुण ४३ हजार २५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्हा अन्वेषण कारवाईत राज्य उत्पादन शुल्क, अकोला विभागाचे निरीक्षक, दुय्यम निरीक्षक,सहा.दुय्यम निरीक्षक, जवान, व जवान-नि-वाहनचालक यांनी सहभाग घेतला यापुढेही अवैध मद्यविक्री विरोधात राज्य उत्पादन शुल्क, अकोला विभागाचे धाडसत्र कार्यरत राहील,असे अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क, अकोला स्नेहा सराफ यांनी कळविले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ