रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 137 चाचण्या, चार पॉझिटिव्ह

 


अकोला,दि.16 (जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 137 चाचण्या झाल्या त्यात चार  जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

आज दिवसभरात बार्शीटाकळी येथे तीन, तेल्हारा येथे 27, मुर्तिजापूर येथे पाच, अकोला आयएमए येथे सात, आरोग्य कर्मचारी येथे 47 चाचण्या झाल्या त्यात कुणीही  पॉझिटीव्ह आले नाही. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 42 चाचण्या होऊन तीन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तर हेडगेवार लॅब येथे सहा चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यात 27 हजार 294 रॅपिड ॲन्टीजेन चाचण्या झाल्या त्यापैकी 1869 पॉझिटीव्ह आले आहेत,  असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ