रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 120 चाचण्या, 10 पॉझिटिव्ह

 अकोला,दि.2 (जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 120 चाचण्या झाल्या त्यात 10 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह ला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

आज दिवसभरात  अकोट येथे 11, बाळापुर येथे सहा,  आयएमए येथे एक, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या 30 चाचण्या झाल्या त्यात एकही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. तर  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 65 जणांच्या चाचण्या झाल्या त्यात नऊ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले तर हेडगेवार प्रयोगशाळेत  सात जणांच्या चाचण्या झाल्या त्यात एक जणाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. असे एकूण 120 जणांच्या चाचण्या होऊन दहा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आजपर्यंत 25476 चाचण्या झाल्या त्यात 1803 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन