पाळीव प्राण्यांची दुकाने, श्वान प्रजनन व विपणन केंद्रांची नोंदणी बंधनकारक- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आदेश

                            अकोला,दि.२४(जिमाका)-  प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबतचा अधिनिय, १९६० अंतर्गत  पाळीव प्राणी दुकाने, श्वान प्रजनन व विपणन केंद्र हे २०१८ व २०१७ मध्ये अधिसुचित केलेले असल्याने अशा दुकानांची नोंदणी ही राज्य प्राणी कल्याण  मंडळाकडे करणे बंधनकारक असून जी केंद्र नोंदणी न करता सुरु असतील अशा केंद्रावर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी  तथा जिल्हा प्राणी क्लेष प्रतिबंधक समितीचे अध्यक्ष जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.

या संदर्भात  जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्या कार्यालयातून देण्यात आलेल्या माहितीनुसार, केंद्र शासनाने प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९६० अंतर्गत   पाळीव प्राणी दुकान  नियम २०१८ आणि श्वान प्रजनन व विपणन केंद्र  नियम २०१७ यांना अधिसुचित केले आहे.  त्यानुसार  पाळीव प्राण्यांच्या  दुकानांना राज्य प्राणी कल्याण मंडळाकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. तसेच नोंदणी शिवाय अशी श्वान प्रजनन केंद्र चालविण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. यामुळे  अशी दुकाने  राज्य प्राणी कल्याण मंडळाकडे नोंदणी केल्याशिवाय सुरु करता येणार नाही.

             कोरोना महामारीच्या अनुषंगाने  शासनाच्या महसुल विभागाच्या सूचनेनुसार  निर्बंध शिथिल करुन टाळेबंदी टप्याटप्याने उठवण्यात आली आहे. सर्व बाजारपेठ व दुकाने सुरु करण्यास सशर्त परवानगी देण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्यापासून सर्व पाळीव प्राण्यांची दुकाने व श्वान प्रजनन व विपणन केंद्र यांना महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळामार्फत नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे आवश्यक व बंधनकारक आहे. तरी जिल्ह्यातील  सर्व पाळीव प्राणी दुकाने तसेच श्वान प्रजनन व विपणन केंद्राच्या संचालकांनी जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन कार्यालयाकडून तात्काळ माहिती घेऊन महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळाकडे नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त तथा सदस्य सचिव जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीचे डॉ. तुषार बावने यांनी केले आहे.

जे पाळीव प्राण्यांची दुकाने, श्वान प्रजनन व विपणन केंद्र नोंदणी न करता सुरु राहतील अशा सेंटर वर कडक कार्यवाही करण्याचे  निर्देश जिल्हाधिकारी तथा  जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीचे अध्यक्ष  जितेंद्र पापळकर यांनी दिले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ