९९ अहवाल प्राप्त; २१ पॉझिटीव्ह, ९१ डिस्चार्ज, एक मयत

 अकोला,दि. १४ (जिमाका)-आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे ९९ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ७८ अहवाल निगेटीव्ह तर २१ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले.  दरम्यान एका रुग्णाचा उपचार घेतांना एका खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. तर ९१ जणांना  डिस्चार्ज देण्यात आला आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.१३) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये तीन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या  ९८८८ (७९००+१८११+१७७) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

            शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण  ६२०१२ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ६०४५८  फेरतपासणीचे २६३ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १२९१ नमुने होते. आजपर्यंत एकूण ६१७२५ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ५३८२५ तर पॉझिटीव्ह अहवाल ९८८८ (७९००+१८११+१७७) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज २१ पॉझिटिव्ह

 आज दिवसभरात २१  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आज सकाळी २१ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात नऊ महिला व १२ पुरुषांचा समावेश आहे.त्यातील राधाकिशन प्लॉट, गोरक्षण रोड, लहान उमरी व अकोट येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित   व्याळा ता. बाळापूर, राम नगर, मोठी उमरी, कौलखेड, डाबकी रोड, जीएमसी बॉईज हॉस्टेल, जवाहर नगर, गीता नगर, आकाशवाणी नगर, जठारपेठ, खडकी, आंबेडकर चौक व आदर्श कॉलनी  येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. तर आज सायंकाळी कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. 

 

 

दरम्यान काल रात्री (दि.१३)रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात तीन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

एकाचा मृत्यू

दरम्यान आज एका खाजगी हॉस्पिटल येथे एकाचा मृत्यू झाला. मयत रुग्ण कबीर नगर, अकोला येथील ६२ वर्षीय महिला असून  उपचार दरम्यान मुत्यू झाला. त्यांना दि.९ रोजी दाखल करण्यात आले होते.

९१ जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून एक, आयकॉन हॉस्पीटल येथून चार, बिहाडे हॉस्पीटल येथून एक, हॉटेल रिजेंसी येथून दोन,  हॉटेल स्कायलार्क येथून एक, तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले ८२ अशा एकूण ९१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

६५२ रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या ९८८८ (७९००+१८११+१७७)आहे. त्यातील ३०४ जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची ८९३२ संख्या  आहे. तर सद्यस्थितीत ६५२ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ