ग्रा.पं. निवडणुक 2020-21 जात पडताळणी प्रस्ताव नामनिर्देशनाच्या अंतिम दिनांकापर्यंत दाखल करुन घ्यावे- जिल्हाधिकारी पापळकर यांचे निर्देश

 

अकोला,दि. 17(जिमाका)-  ग्रामपंचायत निवडणूकीत आरक्षित जागेवर उमेदवारी करु इच्छिणाऱ्या उमेदवारास जात प्रमाणपत्राची पडताळणी प्रस्ताव दाखल  करणे सोईचे व्हावे यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज स्विकारावे व सही शिक्क्यानिशी प्रमाणित करुन पडताळणी समितीकडे प्रस्ताव दाखल करावे,असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.

यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेल्या निर्देशात म्हटले आहे की, राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील 532 ग्रामपंचायतींपैकी 225 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम घोषीत केला आहे. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आरक्षीत जागेवर निवडणूक लढविणाऱ्या इच्छूक उमेदवारांना नामनिर्देशन पत्रासोबत वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी पडताळणी समितीकडे सादर केलेल्या अर्जाची सत्यपत्र किवा पडताळणी समितीकडे अर्ज केला असल्याबाबतचा अन्य कोणताही पुरावा जोडणे आवश्यक आहे. तथापि, ग्रामपंचायतीच्या आरक्षित जागेवर निवडणूका लढविणाऱ्या इच्छूक उमेदवारास जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव दाखल करणे सोईचे व्हावे  यासाठी तहसिलदार अथवा निवडणूक अधिकारी यांनी त्याच्या कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायतीच्या आरक्षित जागेवर निवडणूक लढविणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून जातीचे प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज नामनिर्देशन भरण्याच्या दिलेल्या मुदतीपर्यत अखेरच्या दिवसापर्यंत स्विकारावे. प्राप्त झालेल्या अर्जावर तहसिलदार तथा निवडणूक अधिकारी यांनी सही शिक्यानिशी प्रमाणित करुन लगेच जात पडताळणी समितीकडे सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ