रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 77 चाचण्या, चार पॉझिटिव्ह

अकोला,दि.8 (जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 77 चाचण्या झाल्या त्यात चार  जणांचा अहवाल पॉझिटिव्ह ला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

आज दिवसभरात अकोट येथे पाच, बाळापूर येथे तीन, बार्शिटाकळी येथे दोन, तेल्हारा येथे एक  मुर्तिजापूर येथे सात चाचण्या झाल्या त्यात एकही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. तसेच  अकोला आयएमए येथे चार चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, आरोग्य कर्मचारी येथे 27 जणांच्या चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे 26 जणांच्या चाचण्या झाल्या त्यात दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, हेडगेवार प्रयोगशाळा येथे दोन चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला,  असे एकूण 77 जणांच्या चाचण्या होऊन चार जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आजपर्यंत 26393 चाचण्या झाल्या त्यात 1832 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना