रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 161 चाचण्या, सहा पॉझिटिव्ह
अकोला,दि.4 (जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे.
यात आज दिवसभरात झालेल्या 161 चाचण्या झाल्या त्यात सहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती निवासी
उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.
आज दिवसभरात अकोट येथे दोन, बाळापूर येथे सहा, बार्शिटाकळी येथे
30, पातूर येथे दोन, तेल्हारा येथे 21 तर मुर्तिजापूर येथे एक चाचण्या
झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, तसेच आयएमए येथे नऊ
चाचण्या झाल्या त्यात दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, आरोग्य
कर्मचाऱ्यांच्या 37 चाचण्या झाल्या त्यात एकही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 49 जणांच्या
चाचण्या झाल्या त्यात चार जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले तर हेडगेवार प्रयोगशाळेत चार
चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे एकूण 161 जणांच्या चाचण्या होऊन सहा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आजपर्यंत
25834 चाचण्या झाल्या त्यात 1813 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा