390 अहवाल प्राप्त; 29 पॉझिटीव्ह, 49 डिस्चार्ज, एकाचा मृत्यू
अकोला,दि.3 (जिमाका)-आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 390 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 361 अहवाल निगेटीव्ह तर
29 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आज एका व्यक्तीचा
मृत्यू झाल्याची नोंद आहे.
त्याच प्रमाणे काल (दि.2) रॅपिड ॲटीजेन टेस्ट
मध्ये 10 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह
अहवालांची एकूण संख्या 9530(7598+1755+177) झाली आहे.
आज दिवसभरात 49 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला,
अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय
सूत्रांनी दिली आहे.
शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत
एकूण 55182 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक
तपासणीचे 53797 फेरतपासणीचे
250 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1135
नमुने होते. आजपर्यंत एकूण 54888 अहवाल
प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 47290 तर
पॉझिटीव्ह अहवाल 9530(7598+1755+177) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली
आहे.
आज 29 पॉझिटिव्ह
आज दिवसभरात 29 जणांचे अहवाल
पॉझिटीव्ह आले. त्यात आज सकाळी 29 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह
आले. त्यात सात महिला व 22 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील
जठारपेठ, सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी तीन, प्रोफेसर कॉलनी, बंजारा नगर व गोरक्षण रोड येथील
प्रत्येकी दोन, उर्वरित शिवर, महसूल
कॉलनी, रतनलाल प्लॉट, राधाकिसन प्लॉट,
रजपूत पुरा, कृषि नगर, सांगळुद,
पारस, रणपिसे नगर, बाळापूर,
यवतमाळ अर्बन बँक अकोला, गुलजार पुरा, पाटील मार्केट, बाळापूर नाका, आंबेडकर
नगर, रामदास पेठ आणि बोरगाव मंजू येथील प्रत्येकी एक
याप्रमाणे रहिवासी आहेत. तसेच आज सायंकाळी एकही अहवाल
पॉझिटीव्ह आला नाही, अशी
माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. दरम्यान काल (दि.2) रोजी रात्री
रॅपिड ॲन्टीजेन टेस्ट मध्ये 10 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला
होता. त्यांचाही समावेश आजच्या एकुण रुग्ण संख़्या व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्ण
संख्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.
एकाचा मृत्यू
दरम्यान काल रात्री
उपचार घेतांना सहकार नगर येथील 87 वर्षीय पुरुष रुग्णाचा
मृत्यू झाला. त्यांना दि.25 नोव्हेंबर दाखल करण्यात आले
होते.
49 जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून एक
जण, अकोला ॲक्सीडेंट क्लिनिक येथून एक, आयकॉन
हॉस्पीटल येथून सात, ओझोन हॉस्पीटल येथून आठ, हॉटेल रिजेन्सी येथून पाच, सूर्यचंद्रा हॉस्पीटल
येथून तीन, बिऱ्हाडे हॉस्पीटल येथून चार तसेच होम आयसोलेशनचा
कालावधी पूर्ण झालेले 20 जण, अशा एकूण 49 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे,अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक
कार्यालयातून देण्यात आली आहे.
572 रुग्णांवर उपचार सुरु
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा