रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 287 चाचण्या; दोन पॉझिटीव्ह


अकोला,दि. 30(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 287 चाचण्या झाल्या त्यात दोन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला,अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

आज दिवसभरात  अकोट येथे 17 जणांच्या चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, तर अकोट येथे 75, बार्शिटाकळी येथे 25, तेल्हारा येथे 59, मुर्तिजापूर येथे 16, अकोला आयएमए येथे 55, हेडगेवार लॅब येथे सहा, तर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या 10 चाचण्या झाल्या त्यात एकही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 24 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यात 28 हजार 904 रॅपिड ॲन्टीजेन चाचण्या झाल्या त्यापैकी 1926 पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ