पिंजरा पद्धतीने मत्स्यसंवर्धन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

 अकोला,दि.२४(जिमाका)- प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत पिंजरा पद्धतीने मत्स्यसंवर्धन योजनेकरीता पाच पिंजऱ्याकरीता अनुदानाची योजना अनुज्ञेय असून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय यांनी केले आहे.

 या योजनेअंतर्गत पिंजऱ्यांच्या संख्येमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. तशी वाढ झाल्यास वाढीव पिंजऱ्यावरील अनुदान उपलब्ध करुन देण्यात येईल. योजना पाच पिंजऱ्याची असली तरी एकुण १८ पिंजऱ्यांपर्यत (म्हणजे १३ पिंजरे स्वखर्चाने जलाशयात टाकण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल. याबाबत कोणत्या जलाशयात किती पिंजरे टाकण्याची  तरतूद उपलब्ध आहे, याबाबतची माहिती सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांच्या कार्यालयाच्या प्रधानमंत्री  मस्त्यसंपदा योजना या कक्षातुन घेण्यात यावी. पिंजरा योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या व्यक्तीस अनुदान लाभ मिळु न शकल्यास स्वखर्चाने या योजनेचा लाभ घेता येईल. स्वखर्चाने लाभ घेण्यास इच्छुक असल्यास तसे अर्ज करताना स्पष्ट नमुद करावे. अनुदान योजना लाभार्थी अंतिम झाल्यावर जागा उपलब्धतेनुसार सर्व विना अनुदानीत पिंजरा योजनेच्या अर्जदारांचा विचार करण्यात येईल, अशी माहिती जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांनी दिली आहे.  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ