496 अहवाल प्राप्त; 47 पॉझिटीव्ह, 17 डिस्चार्ज, एकाचा मृत्यू

 

अकोला,दि. 20(जिमाका)-आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 496 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 449 अहवाल निगेटीव्ह तर 47 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. दरम्यान एका रुग्णाचा उपचार घेतांना रुग्णालयात मृत्यू झाला आहे. तर 17 जणांना  डिस्चार्ज देण्यात आला आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.19) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये सहा जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या  10169(8154+1838+177) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

            शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण  66467 जणांचे  पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 64880 फेरतपासणीचे 271 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1316 नमुने होते. आजपर्यंत एकूण 66146 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 57992 तर पॉझिटीव्ह अहवाल 10169(8154+1838+177) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज 47 पॉझिटिव्ह

 आज दिवसभरात 47  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आज सकाळी 44 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 13 महिला व 31 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील केशव नगर येथील पाच, राम नगर  येथील चार, रणपिसे नगर, कौलखेड, गौरक्षण रोड व खेतान नगर येथील प्रत्येकी तीन जण, सिध्दी कॅम्प व बिर्ला रोड येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित मुर्तिजापूर, आरोग्य नगर, जीएमसी हॉस्टेल, मोठी उमरी, उरळ ता. बाळापूर, कृषि नगर, पत्रकार कॉलनी, आळशी प्लॉट,  तोष्णीवाल लेआऊट, तापडीया नगर, तेल्हारा, हरिश कॉलनी, छोटी उमरी, डोंगरगाव, आदर्श कॉलनी, पारस, अकोट, सिंधी कॅम्प व रतनलाल प्लॉट येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे.  तसेच आज सायंकाळी तिघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात तीन पुरुषांचा समावेश असून दोन गोरक्षण रोड येथील तर मोठी उमरी येथील एक याप्रमाणे रहिवाशी आहे.

दरम्यान काल रात्री (दि.19)रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात सहा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

17 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून 12, आयकॉन हॉस्पीटल येथून एक, बिहाडे हॉस्पीटल येथून तीन तर युनिक हॉस्पिटल येथून एक,  अशा एकूण 17 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

एकाचा मृत्यू

दरम्यान आज  खाजगी हॉस्पिटल येथून एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण दहिगाव ता. तेल्हारा येथील 67 वर्षीय पुरुषाचा उपचार दरम्यान मुत्यू झाला त्यांना 18 डिसेंबर रोजी दाखल करण्यात आले होते.

791 रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 10169(8154+1838+177) आहे. त्यातील 311 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 9067 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 791 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ