जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची सभा संपन्न




अकोला,दि.9(जिमाका):- जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची सभा खासदार तथा केंद्रीय मानव संसाधन , दूरसंचार, माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री ना. संजय धोत्रे यांच्या अध्यक्षतेखाली  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात संपन्न झाली. यावेळी आ. हरिष पिंपळे,  आ. प्रकाश भारसाकळे,आ. रणधिर सावरकर, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक हरीप्रसाद मिश्रा यांची  प्रमुख उपस्थिती होती.
प्रत्येक विभागाने आपल्या विभागाची स्वतंत्र वेबसाईट तयार करून त्यामध्ये आपल्या विभागाच्या योजनांची  माहिती  तसेच लाभार्थ्यांची यादी  अद्यावत करावी असे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री  ना. संजय धोत्रे यांनी दिले. मागील इतिवृत्ताचा  अनुपालन अहवाल संबधीत विभागानी तात्काळ जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे सादर करावा  असेही त्यांनी सांगितले. यावेळी  प्रधानमंत्री ग्रामसडक योजना  , प्रधानमंत्री आवास योजना , स्वच्छ भारत मिशन  , ग्रामीण पाणि पुरवठा योजना , दिनदयाल अंत्योदय योजना , दिनदयाल उपाध्याय ग्रामीण ज्योती योजना आदि योजनांचा आढावा  यावेळी घेण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन विस्तार अधिकारी गजानन महल्ले यांनी केले. यावेळी विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.
00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ