केलपाणी ग्रामपंचायत निवडणुकः मतदान व मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्री बंद


अकोला,दि.29(जिमाका)-  अकोट तालुक्यातील नव्याने स्थापित ग्रामपंचायत केलपाणीच्या  निवडणुकीसाठी निवडणुक कार्यक्रमानुसार  शनिवार, दि. 31 रोजी मतदान व मंगळवार दि.3 सप्टेंबर रोजी तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे.
            मा.राज्य निवडणुक आयोगाचे निर्देशानुसार, शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी निवडणुकीच्या एक दिवस  अगोदर व निवडणुकीच्या दिवशी तसेच मतमोजणीच्या दिवशी ज्या गावामध्ये  ग्रामपंचायत निवडणुक आहेत त्या ठिकाणच्या सर्व किरकोळ व ठोक मद्य विक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश  जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
त्यानुसार, केलपाणी ता. अकोट ग्रामपंचायतीमध्ये मतदानाच्या अगोदरचा दिवस दिनांक 30/8/2019 व दि.31/08/2019 रोजी मतदान होणार आहे. तसेच मतमोजणी ही संबधीत तहसिल कार्यालय अकोट येथे दिनांक 03/09/2019 रोजी होणार असल्याने ज्या दिवशी ज्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे. त्या ठिकाणचे सर्व किरकोळ देशी/ विदेशी  दारु दुकाने / अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे बंद राहतील असे आदेश  देण्यात आले आहेत,या आदेशाचे उल्लंघन करण्याऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असेही कळविण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ