विषबाधा रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करा-पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांचे निर्देश


विषबाधा रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करा

पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांचे निर्देश; रुग्णांची केली विचारपूस
शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदानावर संरक्षक किट, स्वतंत्र नियंत्रण कक्ष कार्यान्वित
        अकोला,दि.26(जिमाका)- जिल्ह्यात पिकावर फवारणी करतांना किटकनाशकांमुळे विषबाधा झाल्याच्या घटना रोखण्यासाठी संबंधित यंत्रणांनी युद्धपातळीवर प्रयत्न करावे. शेतकरी- शेतमजूर यांना फवारणी करण्यासाठी लागणारे संरक्षक किट हे 90 टक्के अनुदानावर उपलब्ध करुन द्यावे, तसेच या घटनांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी  जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र नियंत्रण कक्षही तात्काळ कार्यान्वित करण्यात यावा, असे निर्देश राज्याचे  गृह(शहरे), विधी व न्यायविभाग, संसदीय कार्य, माजी सैनिकांचे कल्याण, कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागांचे राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.डॉ.रणजित पाटील  यांनी आज येथे दिले.
जिल्ह्यात पिकांवर किटकनाशक फवारणी करतांना विषबाधेचे प्रकार घडत असून ते रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याबाबत पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी आज आढावा घेतला. या बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.घोरपडे,  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मोहन वाघ तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.
यावेळी माहिती देण्यात आली की, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात सद्यस्थितीत  किटकनाशक फवारणी करतांना विषबाधा झालेले जानेवारी  2019 पासून एकूण 140 रुग्ण दाखल झाले. त्यापैकी सद्यस्थितीत ऑगस्ट महिन्यात दाखल 109 रुग्ण दाखल झाले. 76 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. तर 33 जणांवर अद्याप उपचार सुरु आहेत. त्यात काही बाहेर जिल्ह्यातील शेतकरी असून त्यात अकोला जिल्ह्यातील शेतकरी हे 102 असून 26 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.  घोरपडे यांनी दिली.
जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मोहन वाघ यांनी माहिती दिली की, किटकनाशक फवारणी करतांना घ्यावयाची काळजी याबाबत, शेतकऱ्यांमध्ये मोठ्याप्रमाणावर जनजागृती सुरु आहे. जिल्ह्यात 1023  गावातील 3 लाख 17 हजार  खातेदारांना येत्‍या 8  दिवसात प्रत्‍येकाच्‍या घरी जाऊन किटकनाशके फवारणी करतांना काय काळजी घ्‍यावीकिटकनाशके हाताळणी करतांना काय काळजी घ्‍यावीकोणत्‍या किटकनाशकात कोणते बुरशी नाशके मिसळावीतकोणत्‍या किड / रोगांच्‍या नियंत्रणासाठी किती प्रमाणात द्रावण तयार करावेकिटकनाशके खरेदी करतांना काय काळजी घ्‍यावी, किटकनाशके साठवणुक करतांना काय काळजी घ्‍यावी इ. बाबत घडिपत्रिकेद्वारे घरपोच  मार्गदर्शन करण्यात येईल. दरम्यान किटकनाशके फवारणी करणारे शेतमजुर  व शेतकरी यांची तालुकास्‍तरावर PHC व उपकेंद्रावर वैद्यकीय तपासणी करण्यासाठी शिबिर आयोजित केले असुन तपासणी सुरु आहेत. तसेच जिल्‍हयातील किटकनाशके विक्री केंद्र व साठवणुक केंद्र यांची किटकनाशके कायदा 1968  मधील तरतुदीनुसार तपासणी करुन  व कमी दर्जाचे ‘क’ व ‘ड’ वर्गातील किटकनाशकाचे नमुने काढणे व गुणवत्‍ता तपासणीसाठी प्रयोगशाळा पाठविणे इ. मोहीम राबविण्‍यात येत आहेतसे आदेश सर्व गुणवत्‍ता नियंत्रण निरीक्षक यांना देण्यात आले आहेत. याच संदर्भात बुधवार दि. 28 रोजी दुपारी तीन वा. अकोला जिल्ह्यातील किटकनाशके विक्रेते व उत्‍पादकांची सभा जिल्‍हा नियोजन समिती सभागृहात आयोजित केली आहे. त्यांच्याद्वारे प्रत्‍येकी 3  गावांमध्‍ये Mobile Van व्‍दारे प्रात्‍याक्षिक दाखविण्याचे व जनजागृती करण्याचे नियोजन केले आहेहे अभियान 15 सप्टेंबर  पर्यंत सुरु राहील. तसेच  मौजे अंदुरा ता.बाळापुर येथील कृ‍षी सेवा केंद्र धारकाचा किटकनाशके अधिनियम 1968 नुसार परवाना निलंबित करण्‍याची कार्यवाही सुरु आहे. जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक व जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी यांना किटकनाशके विषबाधेवर पुरेसा Antidote(P.A.M., Atropin)  Choerestarase test इ. साठा  उपलब्‍धतेबाबत सांगण्यात आले आहे. ही मोहीम यशस्‍वी करण्‍यासाठी कृषि विद्यापिठकृषि निविष्‍ठा उत्‍पादककंपनीकृषि मित्रपोलीस पाटीलसरपंच,महसुल मित्रआरोग्‍य सेवककृषि सहाय्यक, क्‍लस्‍टर सहाय्यक यांचे सहकार्य घेतले जात आहे.
पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी निर्देश दिले की, शेतकरी व शेतमजूरांना तात्काळ संरक्षक किट खरेदी करण्यासाठी 90 टक्के अनुदानावर थेट लाभ वितरीत करा. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून पाचशे रुपयांचे संरक्षक साहित्य खरेदी करणाऱ्या शेतकरी शेतमजूरास 90 टक्के अनुदान हे त्याच्या बॅंक खात्यात वर्ग करण्यात येईल.  जिल्हास्तरावर पोलीस नियंत्रण कक्ष (100) व आपत्ती व्यवस्थापन (1077) या क्रमांकावर किटकनाशक फवारतांना विषबाधा झालेल्या शेतकऱ्यांच्या घटनांबाबत तात्काळ माहिती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जेथे ही घटना घडेल तेथे पोलीस पाटील यांनी या घटनांची माहिती तात्काळ देणे बंधनकारक आहे.
यावेळी पालकमंत्री डॉ. पाटील यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले की, हल्ली बाजारात बॅटरीद्वारे चालणारे उच्च दाबाचे फवारणी पंप मिळतात. अनेक शेतकरी त्याचा वापर करतात. मात्र प्रशिक्षण न घेता हे पंप वापरण्या ऐवजी  शेतकऱ्यांनी हाताने चालविले जाणारे नियंत्रित दाबाचे पंप वापरावे.
किटकनाशक विक्रेत्याने शेतकऱ्यांना किटकनाशके विक्री करतांना ज्या प्रमाणे शिफारस असेल त्या प्रमाणातच किटकनाशके द्यावीत. त्याव्यतिरिक्त किटकनाशके देऊ नयेत, तसे केल्यास त्यांचेविरुद्ध कारवाई करण्यात येईल. प्रतिबंधित व अवैध औषध विक्रीवरही विभागाने कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री डॉ. पाटील यांनी दिले.
पालकमंत्र्यांनी केली विषबाधीत रुग्णांची पाहणी
दरम्यान आज सायंकाळी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जाऊन विषबाधीत रुग्णांची प्रत्यक्ष पाहणी केली व विचारपूस केली. यावेळी त्यांचे समवेत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.घोरपडे,  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मोहन वाघ आदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी रुग्णांच्या प्रकृतीची विचारपूस करुन  त्यांना धीर दिला व त्यांच्या उपचारासाठी सर्व सुविधा देऊ करण्याबाबत आश्वस्त केले. तसेच त्यांच्यावर संपुर्ण उपचार करावे,असे वैद्यकीय यंत्रणांना निर्देश दिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ