जिल्हास्तर शालेय क्रीडा स्पर्धाःआयोजन तारखेत बदल



      अकोला, दि.8 (जिमाका)- जिल्हा क्रीडा अधिकारी  कार्यालय व  जिल्हा क्रीडा  परिषद, अकोला  यांचे संयुक्त  विद्यमाने आयोजित  म.न.पा. व  अकोला जिल्हास्तर शालेय हॅण्डबॉल, बॅडमिंटन, हॉलीबॉल, हॉकी, नेहरू कप हॉकी स्पर्धा आयोजनाचा क्रीडा स्पर्धा कार्यकम जाहीर  करण्यात आला होता. तथापि तांत्रिक कारणास्तव  या स्पर्धा आयोजनात  बदल करण्यात आला आहे.
बदलेल्या नियोजनानुसार होणाऱ्या स्पर्धा-
 शालेय कराटे अकोला म.न.पा  व अकोला जिल्हा क्षेत्रासाठी (14 वर्षाआतील मुले/ मुली)- दि.20 ऑगस्ट,
(17 वर्षाआतील मुले/मुली)- दि.21  ऑगस्ट,(19  वर्षाआतील मुले/ मुली)- दि.22 ऑगस्ट.
शालेय बॅडमिंटन अकोला म.न.पा. क्षेत्र (14 वर्षाआतील मुले/मुली)- दि.27ऑगस्ट, (17 वर्षाआतील मुले/मुली)- दि.28 ऑगस्ट, (19 वर्षाआतील मुले/मुली)- दि.29 ऑगस्ट. अकोला जिल्हाक्षेत्र  (14,17,19 वर्षाआतील मुले /मुली)- दि.30 ऑगस्ट.     
नेहरू कप हॉकी अकोला म.न.पा क्षेत्र (15 वर्षा आतील मुले)- दि.20 ऑगस्ट,(17 वर्षा आतील मुले/मुली) दि.21  ऑगस्ट, अकोला जिल्हाक्षेत्र (15 वर्षा आतील मुले व  17  वर्षा आतील मुले / मुली) दि.22 ऑगस्ट.
शालेय हॉकी अकोला म.न.पा क्षेत्र (14 वर्षा आतील मुले/मुली)- दि.23 ऑगस्ट, (17 वर्षा आतील मुले/मुली)- दि.24 ऑगस्ट, (19 वर्षा आतील मुले/मुली)- दि.25 ऑगस्ट. अकोला जिल्हाक्षेत्र (14, 17, 19 वर्षा आतील मुले/ मुली)- दि.27 ऑगस्ट.
शालेय हॅण्डबॉल अकोला म.न.पा क्षेत्र (14 वर्षाआतील मुले/मुली)- दि.27 ऑगस्ट, (17 वर्षा आतील मुले/मुली)- दि.28 ऑगस्ट, (19 वर्षा आतील मुले/मुली)- दि.29ऑगस्ट. अकोला जिल्हाक्षेत्र (14,17,19 वर्षाआतील मुले/मुली)- दि.30 ऑगस्ट.
शालेय व्हॉलीबॉल अकोला जिल्हा क्षेत्र (14,17,19 वर्षाआतील मुले/ मुली) दि.27 ऑगस्ट.
शालेय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या   जिल्ह्यातील सर्व  व्यवस्थापना अंतर्गत येणाऱ्या  शैक्षणिक संस्थांनी झालेल्या बदलाची नोंद घेवून दिलेल्या तारखेनुसार  आपले खेळाडू नियोजीत ठिकाणी  उपस्थित ठेवावे,असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी  कार्यालय, अकोला येथे  संपर्क  साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.
00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ