साहसी क्रीडा प्रकार आयोजित करणाऱ्या संस्थांना नोंदणी करण्याच्या सुचना


अकोला,दि.22(जिमाका)- जिल्ह्यामध्ये  जमीन, जल व हवाई  साहसी  क्रीडा  प्रकार आयोजीत  करणाऱ्या  संस्थांना  शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दिनांक 26 जुलै,  2018 च्या शासन निर्णयान्वये नोंदणी  करणे आवश्यक   असून त्यांनी ३१ ऑगस्ट पुर्वी आपले अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
साहसी क्रीडा प्रकाराबाबत दि.  26 जुन 2014 च्या शासन निर्णयामधील  तृटी व व्याहारीक अडचणी विचारात घेवून शासनाने जमीन,जल व हवाई साहसी  क्रीडा प्रकारातील तज्ज्ञांच्या समितीने शिफारसी विचारात घेवून  तसेच पर्यटन  व सांस्कृतिक  विभाग यांचे  अभिप्राय व या  क्षेत्रातील काही काही तज्ज्ञांचे    विचारात  घेवून सुधारीत नियम निर्गमित केले आहेत.त्यानुसार, शासन निर्णयानुसार  साहसी  क्रीडा  प्रकारातील जमिन,  हवाई व जल या  प्रकारात मान्यता नसलेल्या  संस्था  कार्यान्वीत  असल्याचे निदर्शनास  येत असल्यामुळे  शासन निर्णयाव्दारे राज्यातील साहसी उपक्रमा  संदर्भात  केलेले नियम जिल्ह्यात काटेकोरपणे  पालन होणे आवश्यक असल्यामुळे   अकोला जिल्ह्यामध्ये  जमीन, जल व हवाई  साहसी  क्रीडा  प्रकार आयोजीत  करणाऱ्या  संस्थांना आता  नोंदणी  करणे आवश्यक   आहे.  यासाठी शासनाने  जिल्हास्तरावर  जिल्हाधिकारी यांचे  अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या संनियंत्रण  समिती व्दारे उपरोक्त शासन  निर्णयातील नियमांची पुर्तता पुर्ण करीत असलेल्या संस्थांना  नोंदणी  प्रमाणपत्र   प्रदान करून   त्यांचेव्दारे आयोजीत करण्यात येणाऱ्या  मोहीमांच्या  आयोजनास  मान्यता देणार आहे. जिल्ह्यात अवैधरित्या अशी केंद्रे संस्था कार्य करीत असतील तर त्यांच्यावर  नियमानुसार  कार्यवाही  करण्यात  येईल.जिल्ह्यातील साहसी क्रीडा प्रकार आयोजीत करणाऱ्या  संस्थांनी  जिल्हा  क्रीडा अधिकारी कार्यालय, स्व.वसंत देसाई स्टेडियम, अकोला येथुन कार्यालयीन वेळेत  नोंदणी   करणेसाठीचा अर्ज  प्राप्त करून   घेवून  परिपुर्ण  अर्ज दि. 31 ऑगस्ट 2019 पुर्वी जिल्हा क्रीडा अधिकारी, अकोला यांचे कार्यालयात  सादर करावा, असे आवाहन  जिल्हा क्रीडा अधिकारी  आसाराम जाधव  यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ