19 ऑगस्ट रोजी अल्पसंख्याक विकास विभागामार्फत पोलीस शिपाई भरती पुर्व प्रशिक्षण


                                
अकोला,दि.16(जिमाका):- अल्पसंख्याक विकास  विभागामार्फत पोलीस शिपाई भरती पुर्व  प्रशिक्षण  कार्यक्रम 2019-2020 चे   प्रशिक्षण  अंतर्गत   उमेदवाराची निवड करण्याकरीता जिल्ह्यात दिनांक 19 ऑगस्ट 2019 रोजी उमेदवारांची  निवड करण्याकरीता एक दिवसीय  कॅम्प लावण्याबाबत नमुद आहे. या योजनेअंतर्गत  राज्यातील मुस्लीम, ख्रिचन, बौध्द, पारसी, जैन,  आणि ज्यु या  अल्पसंख्याक  समाजातील इच्छुक  उमेदवारांना शासनामार्फत विनामुन्य पोलीस शिपाई भरतीपुर्व  प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
अल्पसंख्याक समाजातील उमेदवारांकडुन प्रशिक्षणाकरीता अर्ज मागविण्यात येत असुनया संदर्भातील  निवड चाचणीसाठी उपस्थित  राहण्याचे  आवाहन करण्यात येत आहे.  तसेच या  प्रशिक्षणाकरीता इच्छुक उमेदवारांनी  दि. 19 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 11.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत  पोलीस  मुख्यालय मैदान लक्झरी बस स्टँड समोर अकोला  येथे सर्व  कागदपत्राच्या  ओरीजनल व छायांकित प्रतिसह उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी  यांनी केले आहे.
000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ