अन्न व्यावसायिकांना नोंदणी प्रमाणपत्र/ नुतनीकरणासाठी ऑनलाईन सुविधा


अकोला,दि.29(जिमाका)-  अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006, नियम व नियमने 2011 ची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्यात दिनांक 05 ऑगष्ट, 2012 पासून सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार सर्व अन्न व्यावसायिकांना परवाना अथवा नोंदणी प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. नोंदणी प्रमाणपत्र व नुतनीकरणासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.ज्या अन्न व्यावसायिकांनी आपले परवाना नोंदणी केलेली नसेल अथवा नुतनीकरण करावयाचे असेल वा पदार्थ वा व्यवसायाचा प्रकार आदी बदल करावयाचे असतील त्यांनी दि.३० सप्टेंबरपर्यंत आपली नोंदणी, नुतनीकरण आदी प्रक्रिया पूर्ण करुन घ्याव्यात असे आवाहन सहाय्यक आयुक्त अन्न औषध प्रशासन यांनी केले आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, अकोला व वाशिम जिल्ह्यातील बऱ्याच अन्न व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत परवाना अथवा नोंदणी प्रमाणपत्र घेतलेली आहेत. मात्र परवाना घेणे आवश्यक असताना त्या ऐवजी नोंदणी प्रमाणपत्र घेतले आहेत. तसेच परवाना अथवा नोंदणी प्रमाणपत्राची मुदत संपल्यानंतरही विना परवाना/नोंदणी प्रमाणपत्र व्यवसायस सुरु आहेत. परवाना/नोंदणी मुदतीत नुतनीकरण न करता ते विलंब शुल्क वाचविण्यासाठी नविन अर्ज करतात अथवा अन्न व्यावसायिकांनी संकेतस्थळावर परवाना अथवा नोंदणी घेताना त्यांच्या व्यवसायाचा प्रकार चुकीचा निवडलेला आहे. याप्रकारच्या सर्व सुधारणा करण्यासाठी अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी दि. 30 सप्टेंबर, 2019 पर्यंत अन्न व्यावसायिकांसाठी  https://foodlicensing.fssai.gov.in/knowfssailicense/ हे संकेतस्थळ सुरु केले असून या संकेतस्थळा भेट देऊन त्यांचे परवाने योग्य आहेत किंवा कसे हे पहावे व त्यामध्ये दुरुस्ती करुन घ्यावी, त्यानंतर दि.1 ऑक्टोबर,2019 नंतर ग्राहकांना/ग्राहक संघटना/सामाजिक संस्थांना वरील संकेतस्थळावर अन्न व्यावसायिकाकडे वैध परवाना आहे काय? परवान्यात उत्पादित करीत असलेला अन्न पदार्थ नमुद आहे काय?व्यवसायाचा प्रकार बरोबर आहे काय? हा तपास करण्याची सोय असेल व या संकेतस्थळावर ग्राहकांना परवाना विषयी तक्रार करण्याची सोय असेल याची नोंद घ्यावी.तरी अकोला व वाशिम जिल्ह्यातील अन्न व्यावसायिकांनी संकेतस्थळास भेट देऊन त्यांचे परवाने योग्य आहेत किंवा कसे? हे तपासून पहावे. जे अन्न व्यावसायिक विना परवाना अथवा विना नोंदणी अन्न व्यवसाय करत असतील त्यांनी तात्काळ अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाचे संकेतस्थळ www.fssai.gov.in  वर अर्ज करावा, असे आवाहन  सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन लो. ग. राठोड यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ