युवा जागरः ‘महाराष्ट्रावर बोलू काही’ शनिवार (दि.10)पासून युवा संसद



अकोला, दि.8 (जिमाका)- शालेय शिक्षण  व क्रीडा विभागा मार्फत  तरूणाईला शासकीय कामकाजाच्या मुख्य प्रवाहात  सामावून घेणे, कार्यक्रम आखणी मध्ये विचारांची दखल घेणे. युवांमध्ये नेतृत्व गुणांचा विकास  करणे, एकंदरीतच राष्ट्रीय व राज्य  विकास प्रक्रियेत युवांना सामावून घेवून राज्यातील युवांच्या  सर्वांगीण  विकासाकरीता युवा जागरः ‘महाराष्ट्रावर बोलू काही  या युवा संसद कार्यक्रमाचे आयोजन जिल्ह्यात महाविद्यालयस्तरावर येत्या शनिवारी म्हणजेच दि.10 पासून राबविण्यात येणार आहे. हा उपक्रम संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव यांनी दिली आहे.
             यासंदर्भात युवा संसद या  कार्यक्रमाचे आयोजनासाठी जिल्हा शिक्षणाधिकारी(माध्यमिक) यांच्या  अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे.
 कार्यक्रमाचे आयोजन  याप्रमाणे–
कॉलेजस्तरावरील वक्तृत्व  स्पर्धा- दि. 10 ते 15 ऑगस्ट,
गटस्तरावरील वक्तृत्व स्पर्धा- दि. 16 ते 20 ऑगस्ट, 
जिल्हास्तर  युवा संसद-दि. 21 ते 26 ऑगस्ट,
राज्यस्तर युवा संसद-दि.28 ते 31 ऑगस्ट.
या कार्यक्रमात कनिष्ठ महाविद्यालयातील 15 ते 19 वयोगटातील युवक  युवतींनी सहभाग घ्यावा,असे आवाहन  जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव यांनी केले आहे.
00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ