भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना:३१ ऑगस्टपर्यंत अर्ज मागविले


अकोला, दि.6 (जिमाका)-  अनुसुचित जाती व नवबौध्द घटकातील शासकीय  वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना   मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणुन भोजन,  निवास  व इतर शैक्षणिक  सुविधा  या विद्यार्थ्यांना  स्वत: उपलब्ध करून घेण्यासाठी  आवश्यक रक्कम संबंधीत विद्यार्थ्यांच्या  आधार संलग्न  बँक खात्यामध्ये थेट वितरीत करण्यासाठी शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब  आंबेडकर स्वाधार योजना सुरू केली आहे.  या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपण शिकत असलेल्या जिल्ह्यात येत्या ३१ तारखेपर्यंत अर्ज करावेत असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाजकल्याण यांनी केले आहे.
            या योजनेच्या अटी व शर्तीमध्ये वसतीगृहामध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांस किमान 50 टक्के  गुण असणे अनिवार्य आहे,  तसेच या योजनेच्या निकषामध्ये   सामाजिक न्याय  विभागाच्या शासकीय  वसतीगृहात  प्रवेशासाठी अर्ज केलेल्या व प्रवेश न मिळालेल्या  विद्यार्थ्यांचा  या योजनेच्या  निवडीसाठी प्राधान्याने विचार करण्यात येईल, या बाबीचा समावेश करण्यात आला आहे. महानगरपालिका /नगरपालीका /एमएमआरडीए/पीएमआरडीए/अनआयटी (Nagpur Investment Trust) या सारख्या प्राधिकरणाच्या  हद्दीतील पाच  कि.मी. परिसरात असलेल्या  महाविद्यालयात शिकत असलेले विद्यार्थीदेखील योजनेचा लाभ  मिळविण्यासाठी पात्र असतील. स्वाधार योजनेकरीता इयत्ता 10 वी नंतर 11 वी  12 वी करीता अर्ज करावा. तसेच इयत्ता 12 वी  नंतरच्या पदवी/पदवीका अभ्यासक्रम तसेच पदव्युत्तर पदवी/पदवीका अभ्यासक्रमाला प्रवेशीत विद्यार्थ्यांना लाभ अनुज्ञेय राहील. विद्यार्थ्यांना कॉलेज जिथे असले त्या जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त , समाज कल्याण यांचकडे अर्ज करता येईल. सन 2018-19 मध्ये  उत्तीर्ण झालेल्या  विद्यार्थ्यांनी  व या योजनेचा लाभ  घेतलेल्या विद्यार्थ्यांनी  त्यांनी  आपली उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका या कार्यालयास सादर करावी. या योजनेचा लाभ घेण्यासाठी  अर्जाचा विहीत http;//sjsa.maharashtra.gov.in ,  http;//www.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर  उपलब्ध आहे.
            अर्ज करतांना अर्जाचा नमुना  डाऊनलोड करून,अर्जासोबत  जोडलेल्या कागदपत्रांच्या यादीसह शिकत असलेल्या जिल्ह्याच्या  सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण  कार्यालयामध्ये समक्ष/टपालाव्दारे /कार्यालयाचे इ-मेलवर (अकोला जिल्ह्यात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ई-मेल- swadhar.swakola@gmail.com ) शनिवार दि.31  ऑगस्ट पर्यंत कार्यालयीन वेळेत दाखल करावा. अधिक माहितीसाठी संबंधीत जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण  कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाजकल्याण अमोल यावलीकर यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ