निवृत्तीवेतन धारकांसाठी नागपूर येथे 23 रोजी पेन्शन अदालत


अकोला, दि.6 (जिमाका)- महालेखापाल नागपुर यांचेकडून निवृत्तीवेतन  नामंजुर/आक्षेपित  झालेल्या सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी यांचे निवृत्तीवेतन विषयक प्रकरणांबाबत शुक्रवार दि.२३ रोजी नागपूर येथे पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुख  तथा आहरण  व संवितरण  अधिकारी यांना यासंदर्भात सुचित करण्यात आले आहे, की, महालेखापाल नागपुर यांचेकडून निवृत्तीवेतन  नामंजुर/आक्षेपित  झालेल्या सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी यांचे निवृत्तीवेतन विषयक प्रकरणे निकाली काढण्यासाठी  वित्त विभाग , महाराष्ट्र शासन व संचालक, लेखा व कोषागारे,  मुंबई तसेच महालेखापाल  नागपुर यांचे संयुक्त विद्यमाने पेन्शन अदालत’ चे आयोजन करण्यात आले आहे. ही पेन्शन अदालत शुक्रवार,दि.23 रोजी सकाळी 9 ते दुपारी एक या कालावधीत साई सभागृह, शंकरनगर, अंबाझरी रोड, व्होकार्ट हॉस्पीटलच्या मागे, नागपूर येथे महालेखापाल नागपूर यांचे प्रतिनिधीच्या उपस्थितीत होणार आहे. यासंदर्भात प्रलंबीत प्रकरणांसह पेन्शन  अदालतीकरीता उपस्थित राहावे, असे आवाहन कोषागार अधिकारी मा.ब. झुंजारे यांनी  कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ