दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना


             अकोला,दि.22(जिमाका)- जिल्ह्यातील अंध  कर्णबधीर अस्थिव्यंग, मतिमंद, कुष्ठरोग  मुक्त दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती  देण्याची योजना  राबविण्यात येत आहे. त्यानुसार महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या  दिव्यांग विद्यार्थ्यांचे प्रस्ताव  मागविण्यात आले आहेत.ही योजना ऑनलाईन  पध्दतीने राबविण्यात येत असुन  आयुक्त कार्यालयाकडुन  कार्यक्रम आखण्यात आला आहे. यात 24  ऑगस्ट पर्यंत विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे प्रस्ताव  ऑनलाईन  सादर  करावेत. तसेच 25 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर 2019  प्राप्त झालेले  प्रस्ताव  तपासुन  कार्यालयास  सादर करणे. 17  ते 30 सप्टेंबर जिल्ह्यांतर्गत  केलेल्या कामाचा अहवाल आयुक्तालयास  सादर करणे याप्रमाणे कालबद्ध कार्यक्रम ठरविणयात आला आहे. तरी दिव्यांग  विद्यार्थ्यांचे प्रस्ताव सादर करावेत,असे आवाहन प्रभारी जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद  अकोला आर. एस.  वसतकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा समाज कल्याण  कार्यालयाशी  संपर्क साधण्याचे आवाहन  करण्यात आले आहे.
            तसेच इयत्ता 1 ते 10 वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना  शालांतपूर्व  शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. या योजनेचे  अर्ज जिल्हा  समाज कल्याण  विभाग जिल्हा परिषद अकोला या  कार्यालयामध्ये  30 सप्टेंबर पर्यंत सादर करण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ