धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी प्रि-मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना




अकोला,दि.05 (जिमाका) –  धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी मा. पंतप्रधान यांनी  घोषित  केलेल्या 15 कलमी कार्यक्रमानुसार राज्यातील  मुस्लिम, ख्रिश्चन, बौध्द, शीख, पारसी  व जैन या धार्मिक अल्पसंख्याक  इयत्ता 1 ली  ते 10 वी च्या  वर्गामध्ये शिकणा-या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना  केंद्र शासनाव्दारे  प्रि- मॅट्रीक  शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. या शिष्यवृत्तीसाठी नविन व नुतनीकरण  विद्यार्थ्यांने  अर्ज ऑनलाईन  सादर करण्याची  अंतिम तारीख  15 ऑक्टोबर  2019 अशी आहे असे अल्पसंख्याक  व प्रौढ  शिक्षण संचालनालय पुणे चे संचालकांनी  कळविले आहे.
या शिष्यवृत्तीसाठी अटी व शर्ती -  इयत्ता 1 ली ते 10 वीच्या सर्व शासकीय / निमशासकीय/ खाजगी अनुदानित/विना अनुदानित/कायम  विना अनुदानित    स्वयं अर्थसहाय्यीत मान्यताप्राप्त शाळांकडून  शिक्षण घेणा-या  अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी ही लागू आहे, अर्जदार विद्यार्थी  मागील वर्षी 50 टक्के पेक्षा  जास्त गुणाने उत्तीर्ण  झालेला असावा, फक्त इयत्ता 1 लीच्या विद्यार्थ्यांसाठी गुणांची अट लागु राहणार नाही,  पालकाचे  वार्षिक उत्पन्न  एक  लाख रूपये पेक्षा कमी  असावे,  एका कुटूंबातील 2 पेक्षा जास्त  विद्यार्थ्यांना  शिष्यवृत्ती मिळणार नाही, अर्ज भरतांना विदयार्थ्यांचा  धर्म, कुटूंबाचे उत्पन्न , गुण व टक्केवारी  इत्यादी माहिती अचुक भरावी , धर्म उत्पन्न , गुणपत्रीका, आधारकार्ड/आधार नोंदणी  पावती, विद्यार्थ्यांचा फोटो  , बँक पासबुकच्या  पहिल्या  पानाची प्रत   इत्यादी कागदपत्रे  मुख्याध्यापकांना   सादर करावीत, पालकांचे वार्षिक उत्पन्नाचे  प्रमाणपत्र  हे सक्षम अधिका-यांने  प्रमाणीत केलेले असणे आवश्यक आहे, या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणा-या  विद्यार्थ्यांनी  इतर तत्सम शिष्यवृत्तीचा लाभ  घेतलेला नसावा, एकुण पात्र विद्यार्थ्यांपैकी 30 टक्के शिष्यवृत्ती विद्यार्थींनीसाठी राखीव आहेत.
सन 2018-19 मध्ये शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या /शिष्यवृत्ती मिळालेल्या आणि  यावर्षी शिष्यवृत्तीच्या अटी पुर्ण करणा-या सर्व विद्यार्थांनी सन 2019-20 करिता नुतनीकरण  विद्यार्थी म्हणुन अर्ज ऑनलाईन  भरणे आवश्यक आहे, नविन अथवा नुतनीकरण  यापैकी एकाच प्रकारचा अर्ज  विद्यार्थ्यांना  भरता येईल.  तसेच एका  विद्यार्थ्यांने नवीन नुतनीकरणासाठी दोनदा अर्ज भरला असेल तर असे अर्ज बाद ठरवले जातील. विद्यार्थ्यांचे  बँक खाते राष्ट्रीयकृत  बँकेचे पाहिजे नसेल तर पालकाच्या  राष्ट्रीयकृत बँक खात्याची माहिती अर्जात भरता येईल परंतू हे  बँक खाते क्रमांक फक्त्‍ 02 पाल्यांसाठीच वापरता  येईल, इयत्ता 1 ली ते 10 वी मधील विद्यार्थ्यांचे नवीन व  नुतनीकरणाचे अर्ज  National Scholarship Portal (NSP 2.0)  (www.scholarships.gov.in) या संकेतस्थळावर भरण्याची जबाबदारी  संबधीत शाळांच्या  मुख्याध्यापकांची  राहील. (टीप:-हे अर्ज भरण्याची सोय www.minorityaffairs.gov.in) या संकेतस्थळावर सुध्दा उपलब्ध आहे,अर्ज भरतांना भ्रमणध्वनी क्रमांक लिहिणे आवश्यक आहे. हा क्रमांक पालकांचा  असेल तर तो दोन पाल्यांसाठीच  वापरता येईल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ