धार्मिक अल्पसंख्याक शाळेमध्ये पायाभुत सुविधा; सुविधा पुरविण्यासाठी 31 ऑगस्ट पर्यंत प्रस्ताव पाठवावे



अकोला,दि.16(जिमाका):- शासन परिपत्रक, अल्पसंख्याक विकास  विभाग, अविवि-2019/प्रक्र.99/का-6, दि.14 मे 2019  नुसार धार्मिक  अल्पसंख्याक विदयार्थी  बहुल शासन मान्य खाजगी  अनुदानित /कायम विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविदयालये , औदयोगीक  प्रशिक्षण संस्था, नगरपालिका/ नगरपरिषद शाळा व अपंग शाळामध्ये पायाभुत सोयी सुविधा  पुरविण्यासाठी अनुदान योजना सन  2019-20 अंतर्गत  अनुदान मिळवू इच्छिणा-या उपरोक्त शाळा/ संस्थाना कळविण्यात येते की, सदर  अनुदान योजना  शासन निर्णय, अल्पसंख्याक विकास विभाग, दि. 7 ऑक्टोंबर 2015 अन्वये राबविण्यात येत आहे.
तरी अनुदान मिळवू इच्छिणा-या संबंधीत संस्थानी सदर शासन निर्णयानुसार परिपुर्ण प्रस्ताव या कार्यालयास  दिनांक 31 ऑगष्ट 2019  पर्यंत मिळतील या बेताने सादर करावेत. मुदतीनंतर प्राप्त होणा-या प्रस्तावाचा विचार केला जाणार नाही तसेच  शासन निर्णयानुसार  अनुदानासाठी पात्र नसतांना प्रस्ताव सादर करण्यात येवू नये. याची संबंधीतांनी नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
                                                                   00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ