ग्राहक संरक्षण परिषद बैठक: ग्राहक हक्कासंदर्भात जनजागृती आवश्यक-जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर


            अकोला,दि.13 (जिमाका)- ग्राहक हक्कासंदर्भात ग्राहकांमध्ये जनजागृती आवश्यक असून त्यासाठी ग्राहक संरक्षण परिषदने मोलाची भूमिका बजवावी असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज येथे केले. आज  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची सभा आयोजीत करण्यात आली होती.
            यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राम लठाड, जिल्हा पुरवठा अधिकारी तुळशीराम काळे  तसेच  अशासकीय सदस्य मधुकर राजाराम सरप, श्रीमती सरलाबाई अशोक मेश्राम,  विष्णूपंत नारायणराव महल्ले, संजय पाठक, अनिल गोपाळराव कोल्टकर, भाऊराव साबळे, दिनेश श्रीवास , ज्योती पाकधुने, चंद्रशेखर पांडे,  गजानन लांडे, सुनिल नारखेडे, सुधाकर पाठक, श्रीराम ठोसर,  मो. परवेज मो. लईक,  संगीता नानोटे, जाकीर बिसमिल्ला खान , रामप्रसार अहिर यांची उपस्थिती होती.
            यावेळी समिती सदस्यांनी सुचना मांडल्या की, सर्व मालमत्ता व्यवहारांचया नोंदी ऑनलाईन होत असतात त्या सर्व संबधीत विभागांना ऑनलाईन पाठविण्यात याव्यात जेणे करून ग्राहकांना हेलपाटे टाळता येतील. पिक विमा संदर्भात  उंबरठा उत्पादनावर आधारीत निकष  लावून  पिक कापणीच्या वेळी संदर्भात शेतकऱ्यांना  कळविण्यात यावे. सदर पिक कापणी प्रयोगाचे ठिकाणाबाबत प्रत्येक गावात येत्या 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या ग्रामसभेत माहिती दिली जाणार असल्याचे कृषी उपसंचालक अरुण वाघमारे यांनी यावेळी सांगितले.
             तसेच गॅस सिलेंडरच्या संदर्भात सिलेंडरचे  वजन कमी येत असल्याची तक्रार  सदस्यांनी केली. हॉस्पिटलमध्ये  रेट बोर्ड लावण्यात यावा, एमआरपी पेक्षा जास्त  दराने वस्तुंची विक्री करू नये, एसटी बसेसला  खिडक्यांच्या जागी जाळी बसवावी , उज्वला योजनेमध्ये सिलेंडरचे ज्यादा पैसे घेण्यात येतात आदी तक्रारी यावेळी सदस्यांनी केल्या.
            या बैठकीला  उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार, कृषि उपसंचालक अरुण वाघमारे ,  अन्न व औषध निरीक्षक आर.एस. वाकडे  तसेच दुरसंचार विभाग, सहाय्यक नियंत्रक वैद्य मापक शास्त्र ,आरोग्य विभाग  व इतर संबंधीत विभागाचे प्रतिनीधी उपस्थित होते.
या सर्व तक्रारींबाबत जिल्हाधिकारी पापळकर यांनी ग्राहकांच्या जनजागृतीवर भर देणे आवश्यक असल्याचे सांगून जनजागृतीमुळे ग्राहक आपल्या हक्काबाबत जागरुक झालातर आपोआपच फसवणूकीला आळा बसेल. ही जनजागृती घडविण्यात समिती सदस्यांनी पुढाकार घेऊन कार्य करावे,असे आवाहन त्यांनी यावेळी केले. जिल्हा पुरवठा अधिकारी काळे यांणी उपस्थितांचे आभार मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ