जागतिक आदिवासी दिनानिमित्त शुक्रवारी (दि.९) विविध कार्यक्रम


अकोला, दि.6 (जिमाका)-  जागतिक आदिवासी दिनानिमित्त शुक्रवार दि. रोजी  एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,अकोला तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हे कार्यक्रम खंडेलवाल भवन, नेहरुपार्क चौक, अकोला येथे सकाळी साडेदहा वाजता होणार आहेत.
यासंदर्भात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, आदिवासी समाजाचे सांस्कृतिक वेगळेपण, मानवतेबद्दल असीम श्रध्दा, निसर्गावरील अतुलनीय प्रेम, प्रामाणिकपणाचा अत्युच्च  कळस व पारंपारीक निखळगुणांचा  गौरव म्हणून  दरवर्षी जागतिकस्तरावर 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून  साजरा करण्यात येतो. त्याअनुषंगाने प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांचे  वतीने 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी अस्मिता  दिन साजरा  करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात गीत गायन , आदिवासी पारंपारिक नृत्य स्पर्धा, गुणवंत विद्यार्थी सत्कार, नृत्य स्पर्धा विजेत्यांना  पारितोषिक वितरण, व्याख्यान  आदी कार्यक्रम असतील.  या कार्यक्रमास आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक  आदिवासी विकास प्रकल्प , अकोला यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ