‘खेळा मदतीसाठी’:राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जिल्हा प्रशासनाचा उपक्रम

अकोला,दि.26(जिमाका)- पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागात मदत करण्यासाठी राष्ट्रीय क्रीडा दिनाचे (दि.29) औचित्य साधून जिल्हा प्रशासनाने ‘खेळा मदतीसाठी’ हा अभिनव उपक्रम आयोजित केला आहे. या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील विविध संस्थांनी आपापल्या स्तरावर क्रीडा स्पर्धांचे आयोजन करुन प्रत्येक सहभागी खेळाडूने 100 रुपये सहभाग शुल्क भरुन हा निधी जमा करावयाचा असून तो मदतनिधी पूरगस्तांसाठी देण्यात येणार आहे.
पश्चिम महाराष्‍ट्रातील भीषण महापुरामुळे त्‍या भागातील जनजीवन प्रभावित होऊन त्‍याठिकाणी मदत करणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन राष्‍ट्रीय क्रीडा दिवसाचे निमित्‍ताने (गुरुवार दि.२९ ऑगस्‍ट २०१९) विविध शैक्षणिक संस्‍था, महाविद्यालये, क्रीडा संस्‍था, संघटना, बॅंक कर्मचारी संघटना व समाजातील सर्व व्‍यक्‍तींचे स‍मूह यांनी आपले स्‍तरावर क्रीडा स्‍पर्धांचे आयोजन करावयाचे आहे. त्‍या निमित्‍ताने सहभागी होणारे स्‍पर्धक / क्रीडापटू यांचेकडून किमान १०० रुपये नाममात्र सहभाग शुल्‍क घेऊन या निमित्‍ताने संकलन होणारी संपूर्ण रक्‍कम शैक्षणिक गुणवत्‍ता विकास कक्ष, जिल्‍हाधिकारी कार्यालय, अकोला येथे सहभागी स्‍पर्धकांच्‍या  यादीसह जमा करण्यात येणार आहे. संकलित संपूर्ण रक्‍कम पूरग्रस्‍त निधी म्‍हणून मा. मुख्‍यमंत्री सहायता निधीला प्रदान करण्‍यात येईल.शंभर रुपये किंवा अधिक निधी  देणाऱ्या सर्व क्रीडापटूंना जिल्‍हाधिकारी, अकोला यांची स्‍वाक्षरी असलेले प्रमाणपत्र व संस्‍थेला गौरवचिन्‍ह देऊन सन्‍मानित करण्‍यात येईल. सामाजिक बांधिलकी म्‍हणून बहूसंख्‍य नागरिकांनी व सेवाभावी  संस्‍थांनी, विविध कार्यालयांनी या उपक्रमात सहभाग घेऊन योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्‍यमिक) प्रकाश मुकुंद, जिल्‍हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव यांनी केले आहे. या आयोजनाबाबत कुठल्‍याही प्रकारची सक्‍ती नसून,स्‍वेच्‍छेने आयोजन होणे अपेक्षित आहे. खेळा मदतीसाठी, Play For Charity  हे घोषवाक्‍य हृदयात बिंबवून प्रत्‍येक संवेदनशील व्‍यक्‍तीने या क्रीडा दिनाचे निमित्‍ताने आपले योगदान देणे अपेक्षित आहे,असे आवाहन समन्वयक प्रकाश अंधारे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ