सोनाळा गावाजवळील पूल क्षतीग्रस्त झाल्यामुळे वाहतुक बंद




             अकोला,दि.9(जिमाका):- मुर्तिजापुर तालुक्यात  झालेल्या अतिवृष्टीमुळे रोहणा , ब्रम्ही, हिरपूर , सोनाळा, पळसोडा वरील सोनाळा गावाजवळील पुल क्षतीग्रस्त्‍ झाल्यामुळे  वाहतुक बंद करण्यात  आली असल्याचे  उपविभागीय अधिकारी मुर्तिजापुर  यांनी कळविले आहे.
                   मुर्तिजापूर तालुक्यातील कमळगंगा नदीवरील सोनाळा गावाजवळील पुल क्षतीग्रस्त  झालेला आहे. या क्षतीग्रस्त पुलाच्या जागी नवीन पुलाचे बांधकाम मंजुर झालेले आहे. तरी खबरदारीचा उपाय  म्हणून सदर रस्ता वाहतुकीसाठी तात्पुरत्या स्वरूपात उपविभागीय अभियंता  सार्वजनिक बांधकाम उपविभाग मुर्तिजापुर यांच्या पत्रानुसार बंद करण्यात आलेला आहे.
000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना