शाडू माती गणेश मूर्ती कार्यशाळेतून मतदार जनजागृतीचा ‘श्रीगणेशा’


अकोला,दि.१9(जिमाका)- येथील अखिल भारतीय क्षत्रिय महासभेतर्फे आयोजित शाडू मातीची गणेश मूर्ती कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांकडे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी त्यांच्या पालकांसाठी पत्र देऊन मतदान करण्याचे आवाहन करून मतदार जनजागृतीचा श्री गणेशा केला. रविवारी (दि.18) ही कार्यशाळा पार पडली
येथील डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथील दीक्षांत सभागृहात ही कार्यशाळा पार पडली. शाडू मातीची गणेश मूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण या कार्यशाळेत देण्यात आले. या कार्यशाळेचे उद्घाटन राज्याचे गृह(शहरे), विधी व न्यायविभाग, संसदीय कार्य, माजी सैनिकांचे कल्याण, कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागांचे राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले होते. या कार्यशाळेत तब्बल १७०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यांना पर्यावरण मित्र शरद कोकाटे यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना रीतसर शाडू माती पासून गणेश मूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. यात सहभागी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या सहीचे एक पत्र देण्यात आले. त्या पत्रात विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी पर्यावरणपूरक गणेश मूर्ती कार्यशाळेत सहभागी होऊन दिलेल्या योगदानाबद्दल अभिनंदन केले असून या मुलांच्या पालकांनी येत्या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजवावा,त्याबाबत अन्य मतदारांमध्ये जनजागृती करावी,असे आवाहन करण्यात आले आहे.
पर्यावरण पूरक उपक्रमाला प्रोत्साहन देतांनाच मतदान या राष्ट्रीय कर्तव्याबाबत जनजागृती या आयोजनाद्वारे करण्यात आली. या उपक्रमानिमित्त 1700 कुटूंबांमध्ये आई बाबांना हा मतदानाच्या कर्तव्याची आठवण करुन देणारा संदेश पोहोचेल हे महत्त्वाचे. यानिमित्ताने मतदार जागृतीचा ‘श्रीगणेशा’ गणेशमूर्ती कार्यशाळेतून झाला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ