अन्न व्यावसायिकांना नोंदणी प्रमाणपत्र/ नुतनीकरणासाठी ऑनलाईन सुविधा

अकोला,दि.22(जिमाका)-  ज्या अन्न व्यावसायिकांनी आपले परवाना नोंदणी केलेली नसेल अथवा नुतनीकरण करावयाचे असेल वा पदार्थ वा व्यवसायाचा प्रकार आदी बदल करावयाचे असतील त्यांच्यासाठी अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी ऑनलाईन सुविधा उपलब्ध केली आहे. दि.३० सप्टेंबर पर्यंत अन्न व्यावसायिकांनी आपली नोंदणी, नुतनीकरण आदी प्रक्रिया पूर्ण करुन घ्याव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.
अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006, नियम व नियमने 2011 ची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्यात दिनांक 05 ऑगष्ट, 2012 पासून सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार सर्व अन्न व्यावसायिकांना परवाना अथवा नोंदणी प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे.अकोला व वाशिम जिल्ह्यातील बऱ्याच अन्न व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत परवाना अथवा नोंदणी प्रमाणपत्र घेतलेली आहेत. मात्र अन्न व्यावसायिक नमूद कायद्यानुसार परवाना घेणे आवश्यक असताना त्या ऐवजी नोंदणी प्रमाणपत्र घेतलेले आहेत. काही अन्न व्यावसायिक ज्यांचे परवाना अथवा नोंदणी प्रमाणपत्राची मुदत संपल्यानंतरही विना परवाना/नोंदणी प्रमाणपत्र व्यवसाय चालूच ठेवतात. काही अन्न व्यवसायिक परवाना/नोंदणी मुदतीत नुतनीकरण न करता ते विलंब शुल्क वाचविण्यासाठी नविनतम अर्ज करतात. अन्न व्यावसायिकांनी संकेतस्थळावर परवाना अथवा नोंदणी घेताना त्यांच्या व्यवसायाचा प्रकार चुकीचा निवडलेला आहे. तथापि, या सुधारणा करण्यासाठी अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी दि. 30 सप्टेंबर, 2019 पर्यंत अन्न व्यावसायिकांसाठी  https://foodlicensing.fssai.gov.in/knowfssailicense/ हे संकेतस्थळ सुरु केले असून या संकेतस्थळावर ज्या अन्न व्यावसायिकांनी व्यवसायाचा प्रकार चुकीचा निवडला आहे तसेच विक्री करत असलेल्या अन्न पदार्थाचे नाव परवान्यात नमुद नसेल हे पाहता येईल व तसा बदल करता येईल. तरी दि. 30 सप्टेंबर पर्यंत सर्व अन्न व्यावसायिकांनी या संकेतस्थळास भेट देऊन त्यांचे परवाने योग्य आहेत किंवा कसे हे पहावे व त्यामध्ये दुरुस्ती करुन घ्यावी, त्यानंतर दि.1 ऑक्टोबर,2019 नंतर ग्राहकांना/ग्राहक संघटना/सामाजिक संस्थांना वरील संकेतस्थळावर अन्न व्यावसायिकाकडे वैध परवाना आहे काय? परवान्यात उत्पादित करीत असलेला अन्न पदार्थ नमुद आहे काय?व्यवसायाचा प्रकार बरोबर आहे काय? हा तपास करण्याची सोय असेल व या संकेतस्थळावर ग्राहकांना परवाना विषयी तक्रार करण्याची सोय असेल याची नोंद घ्यावी.तरी अकोला व वाशिम जिल्ह्यातील अन्न व्यावसायिकांना असे आवाहन करण्यात येते की, दिनांक 30 सप्टेंबर, 2019 पर्यंत सर्व अन्न व्यावसायिकांनी सदर संकेतस्थळास भेट देऊन त्यांचे परवाने योग्य आहेत किंवा कसे हे तपासून पहावेत. जे अन्न व्यावसायिक विना परवाना अथवा विना नोंदणी अन्न व्यवसाय करत असतील त्यांनी तात्काळ अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाचे संकेतस्थळ www.fssai.gov.in  वर अर्ज करावा, असे आवाहन  सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन लो. ग. राठोड यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ