नागपूर येथे शुक्रवारी (दि.23) पेन्शन अदालत


 अकोला,दि.१९(जिमाका)-  सेवानिवृत्त अधिकारी- कर्मचाऱ्यांची निवृत्ती वेतन विषयक प्रकरणांबाबत   महालेखापाल, नागपूर यांच्या वतीने  शुक्रवार दि.२३ रोजी  पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती  कोषागार अधिकारी मा. ब. झुंजारे यांनी दिली आहे.
  ही पेन्शन अदालत नागपूर येथे शुक्रवार दि.२३ रोजी सकाळी नऊ ते दुपारी एक यावेळात  होणार आहे. साई सभागृह, शंकर नगर, अंबाझरी रोड, वोकहार्ट  हॉस्पिटल मागे, नागपूर येथे महालेखापाल नागपूर यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत या पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.महालेखापाल नागपूर यांच्या कार्यालयाकडून निवृत्ती वेतन नामंजूर, आक्षेपित झालेली प्रकरणे, सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांची निवृत्ती प्रकरणांसह  या पेन्शन अदालतीस उपस्थित रहावे, असे आवाहन कोषागार अधिकारी मा. ब. झुंजारे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ