पुरस्थितीच्या अनुषंगाने योग्य दक्षता घेण्याबाबत सुचना



अकोला,दि.03 (जिमाका)-   जिल्ह्याचे जुन ते सप्टेंबर वार्षिक पर्जन्यमान  697.3 mm  आहे दि. 03 ऑगस्ट 2019 पर्यंत  384.2  mm  पाऊस अपेक्षीत होता. त्यानुसार  प्रत्यक्ष पडलेला पाऊस  382.2  mm  आहे.    त्याची टक्केवारी 99.47 आहे. तर वार्षिक टक्केवारी   54.81  आहे. भारतीय मौसम विभाग नागपुर यांचे  संदेशानुसार  दि. 03  ते 07 ऑगस्ट  2019 दरम्यान  विदर्भातील   सर्व जिल्ह्यातील अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यानुसार पर्जन्यमान वाढल्यास   पुर्णा ,काटेपुर्णा , मन, विद्रुपा  ,गौतमा, पठार  या नदयांच्या पाणीपातळी मध्ये वाढ होऊ शकते तसेच इतरही नदी नाल्यांना  पुर येऊ शकतो. त्यानुसार  पुरस्थितीच्या अनुषंगाने नदीकाठावर गावे असलेल्या नागरीकांनी सतर्क राहावे. नदीकाठावर , पुलावर पुर पाहण्यासाठी गर्दी  करू नये. नदी अथवा  ओढे   , नाल्यावरील पुलावरून पाणी वाहत  असल्यास  पुल ओलांडू  नये. जुनाट /मोडकळीस आलेल्या  इमारतीमध्ये आश्रय घेउू नये. नदीच्या प्रवाहात उतरू नये. अचानक नदीच्या पाणीपातळीमध्ये  वाढ होऊ  शकते. धोकादायक  ठिकाणी सेल्फी काढू नये. आपत्कालीन परिस्थीतीमध्ये नजीकचे  पोलीस स्टेशन , तहसिल कार्यालय, आपत्कालीन यंत्रणांशी संपर्क  साधावा. आपत्कालीन स्थितीत संपर्कासाठी क्रमांक टोल फ्री 1077, 100, 108, 101 यावर संपर्क साधावा.
                                                              00000000000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ