जिल्हास्तरीय मुद्रा बँक योजना समनव्य समिती बैठक; उद्यमशीलता पूरक व्यवसायांना चालना द्यावी-जिल्हाधिकारी पापळकर

अकोला,दि.८(जिमाका):- जिल्ह्यात ज्या व्यवसायांना पोषक वातावरण आहे व ज्या व्यवसायातून उद्यमशीलतेला वाव मिळेल, अशा व्यवसायांना अर्थसहाय्य देण्यासाठी मुद्रा बँक समितीच्या माध्यमातून चालना द्यावी,असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज येथे दिले.
जिल्हास्तरीय मुद्रा बँक समन्वय समितीची बैठक आज जिल्हा नियोजन सभागृहात पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी पापळकर हे होते. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी ज्ञानेश्वर आंबेकर तसेच नवनियुक्त अशासकीय सदस्य योगेश गोतमारे, राहुल वानखेडे, दीपक गवारे, ऍड रुपाली राऊत आदी उपस्थित होते.
नवनियुक्त सदस्यांचे पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी माहिती देण्यात आली की, मुद्रा बँक योजनेची माहिती तळागाळापर्यंत पोहोचावी याकरिता यंदाच्या वर्षासाठी मुद्रा योजनेच्या प्रचार प्रसिद्धीसाठी १५ लक्ष ४० हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यानिधीचे नियोजन करून विविध जनमाध्यमांचा वापर करून या योजनेची माहिती जिल्ह्यात अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रसिद्धी आराखडा मान्य करण्यात आला. जिल्ह्यात तालुकास्तरावर होत असलेल्या बँक मेळाव्यात या योजनेबाबत माहिती देण्यात यावी, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केल्या.
00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ