जिल्हास्तर शालेय कराटे स्पर्धा आयोजनाच्या तारखेत बदल




अकोला,दि.05 (जिमाका) – जिल्हा  क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद , अकोला यांचे संयुक्त विद्यमाने आयोजीत म.न.पा. व अकोला जिल्हास्तर  शालेय कराटे स्पर्धेचे आयोजन  14,17,19 वर्षाआतील मुली दिनांक  07 ते 08 ऑगस्ट    14,17,19  वर्षाआतील मुले दिनांक 08  ते 09   ऑगस्ट  2019  या कालावधीत स्व. वसंत देसाई स्टेडियम  अकोला येथे  आयोजीत करण्यात येणार  होत्या. त्या काही तांत्रिक कारणास्तव  अकोला महानगर पालीका क्षेत्र     अकोला जिल्हास्तर  शालेय कराटे  स्पर्धा  आयोजनाच्या तारखेत बदल करण्यात आला असुन आता  14 वर्षाआतील मुले/मुली दिनांक 20 ऑगस्ट, 17 वर्षाआतील मुले/मुली दिनांक 21 ऑगस्ट व 19 वर्षाआतील मुले/मुली दिनांक 22 ऑगस्ट रोजी होणार आहे.
जिल्हास्तर शालेय कराटे स्पर्धेत सहभागी होणा-या जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांनी  या बदलाची नोंद घेवून सुधारीत तारखेनुसार आपले खेळाडू स्पर्धेसाठी आणावे.असे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालया वसंत देसाई स्टेडियम अकोला  येथे संपर्क साधावा.
00000000000



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ