जिल्ह्यातील संस्थांनी पूरग्रस्तांना मदत करावी; धर्मदाय आयुक्त कार्यालयाचे आवाहन


        अकोला,दि.26(जिमाका)- जिल्ह्यातील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाकडे नोंदणी  झालेल्या संस्थांनी  कोल्हापुर, सांगली, सातारा येथील पुरग्रस्तांना मदत करावी तसेच आर्थ‍िक मदत  मुख्यमंत्री  सहाय्यता निधीत देवून  त्याचा अहवाल सार्वजनिक  न्यास नोंदणी कार्यालय, अकोला या कार्यालयात सादर  करावा,  असे आवाहन  धर्मदाय आयुक्त वि.र. सोनुने  यांनी  केले आहे.
 यासंदर्भात धर्मदाय आयुक्त कार्यालयामार्फत प्रसिध्दीस दिलेल्या  पत्रकात म्हटले आहे की, सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाकडे  नोंदणी झालेल्या अकोला जिल्ह्यातील  सामाजिक, शैक्षणिक,  धार्मिक संस्था तथा रुग्णालयांनी कोल्हापुर, सातारा , सांगली येथील पुरग्रस्तांना मदत करावी, जिवनाश्यक वस्तु, भांडीकुंडी,गॅस शेतक-यांना  शेतीची अवजारे, बि-बियाणे,  अनाथांना कायमस्वरूपी शिक्षण व्यवस्था, कागदपत्रे तयार करण्यासाठी मदत, शिक्षण संस्थांनी मुलांना दत्तक घेवून मोफत शिक्षण देणे, रोजगार उपलब्ध  करुण   देणे, वैद्यकीय सेवा इ. बाबत मदत करावी. मदत आर्थ‍िक   स्वरूपात असल्यास  ती मुख्यमंत्री  सहाय्यता निधी,  स्टेट बँक ऑफ इंडिया, मुख्य शाखा , फोर्ट- मुंबई. 10972433751 येथे जमा करावी. मदत केल्याचा अहवाल सार्वजनिक न्यास  नोंदणी कार्यालय, अकोला या कार्यालयास  सादर करावा, असे आवाहन  धर्मदाय उपआयुक्त वि. र.सोनुने यांनी  केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ