सार्वजनिक गणेश मंडळासाठी सजावट स्‍पर्धा; मतदार जनजागृतीपर देखाव्यांना विशेष पारितोषिक


         अकोला,दि.29(जिमाका)- अकोला जिल्‍हा प्रशासनाने यंदाही सार्वजनिक गणेश मंडळांसाठी सजावट स्‍पर्धेचे आयोजन केले आहे. या स्‍पर्धेमध्‍ये गणेश मंडळांनी सहभागी होऊन राष्‍ट्रीय व सामाजिक संदेश रुजवणारे जनजागृतीपर देखावे सादर करुन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्‍हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.
            यासंदर्भात आवाहन करण्यात आले आहे की, समाजात विविध मानवी कल्‍याणाच्‍या संकल्‍पना रुजविण्‍याच्‍या दृष्‍टीने पर्यावरण पूरकता, स्‍वदेशी जागर, साक्षरता, व्‍यसनमुक्‍ती, स्‍त्री भृण हत्‍या, स्‍वच्‍छ भारत अभियान, ध्‍वनि प्रदुषण, जल संवर्धन, उर्जेचा वापर, कायदा व सुव्‍यवस्‍था, राष्‍ट्रीय एकता व एकात्‍मता, मतदार जनजागृती इ. विविध संकल्‍पना मंडळांनी देखाव्‍याद्वारे सादर करणे अपेक्षित आहे. त्‍याकरिता गुणांकन निश्चित केले आहे. तसेच स्‍पर्धेचे मूल्‍यमापन करण्‍यासाठी प्रशासनाच्‍या वतीने मूल्‍यमापन समिती गठीत करण्‍यात आली आहे. स्‍पर्धेत सहभागी होण्‍याकरिता शैक्षणिक गुणवत्‍ता विकास कक्ष, जिल्‍हाधिकारी कार्यालय, अकोला येथून नोंदणी अर्ज प्राप्‍त करुन पूर्ण भरुन गुरुवार, दि. ५ सप्‍टेंबर पर्यंत कार्यालयीन वेळेत जमा करावा.  सहभागासाठी मंडळाने पोलीस विभागाची रितसर परवानगी घेतलेली असणे गरजेचे आहे. उत्‍कृष्‍ट सादरीकरणाला प्रथम, व्दितीय, तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देऊन समारंभपूर्वक गौरविण्‍यात येईल. मतदार जनजागृतीकरिता उत्‍कृष्‍ट सादरीकरण करणाऱ्या मंडळांना विशेष पारितोषिक देण्‍यात येईल, अशी माहिती उपशिक्षणाधिकारी प्रकाश अंधारे यांनी दिली आहे. अधिक माहितीकरीता शैक्षणिक गुणवत्‍ता विकास कक्ष, जिल्‍हाधिकारी कार्यालय, अकोला येथे संपर्क साधावा. संपर्क क्र. 8484906992.
00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ