नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा


                                           
      अकोला, दि.8 (जिमाका)- भारतीय मौसम विभाग ,नागपुर यांच्या संदेशानुसार गुरुवार  ‍दि. 8 ते सोमवार  दि. 12 ऑगस्ट या दरम्यान  विदर्भातील सर्व जिल्ह्यात पाऊस, वीज पडणे, अतिवृष्टी होणे अशी शक्यता वर्तविली आहे.  तसेच पुर्णा नदीच्या   पातळीतही 23 जुलै पासुन  वाढ होत आहे.  जिल्ह्यातील  पोपटखेड , वान प्रकल्पाच्या  जलसाठ्यातील सातत्याने  वाढ होत आहे. सदर परिस्थिती  पाहता  नदी - नाला काठावर  असणाऱ्या  गावांना सतर्कतेचा  इशारा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर  यांनी दिला आहे.
00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ