जिल्ह्यात जनजागृतीसाठी प्रचार रथ मार्गस्थ: किटकनाशक वापराबाबत जनजागृतीसाठी उत्पादक कंपन्यांनी पुढाकार घ्यावा- जिल्हाधिकारी पापळकर


अकोला,दि.31(जिमाका)- फवारणी करताना होणाऱ्या विषबाधा रोखण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये किटकनाशक वापराबाबत जनजागृती आवश्यक आहे.त्यासाठी शासनासोबत किटकनाशक कंपन्यांनी जनजागृतीसाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी पापळकर यांनी आज येथे केले.
कीटकनाशके फवारणी करताना  शेतकऱ्यांनी घ्यावयाच्या काळजीबाबत जनजागृती व्हावी यासाठी कृषि विभाग व यूपीएल लिमिटेड कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने एका प्रचार रथाद्वारे  केली जाणार आहे. या प्रचार रथाला आज सकाळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते  हिरवी झेंडी दाखवून  मार्गस्थ करण्यात आले. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातून हा रथ जिल्ह्याभरात प्रचार करण्यासाठी मार्गस्थ झाला. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मोहन वाघ, जिल्हा कृषि विकास अधिकारी डॉ. मुरली इंगळे, यूपीएल चे प्रबंधक प्रताप रणखांब यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी माहिती देण्यात आली की,  जिल्ह्यात तीन  प्रचार रथाद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे. दरदिवशी चार गावात प्रचार रथ फिरणार असून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करून ‘सेफ्टी किट’ चे वाटप करण्यात येणार आहे. यावेळी यूपीएल कंपनीद्वारे फवारणी करिता तयार करण्यात आलेल्या बुम स्पेअर मशीनचे उद्घाटन करण्यात आले जिल्ह्यात  अशा प्रकारच्या  40  मशिनद्वारे  कापूस    सोयाबीन  पिकांवर फवारणी करण्यात येणार आहे,अशी माहिती यूपीएल चे प्रबंधक प्रताप रणखांब यांनी दिली. यूपीएल कंपनीद्वारे जिल्ह्यात  पाच हजार पोस्टर्सद्वारे जनजागृती करण्यात येत असून, शेतकऱ्यांना  दोन हजार सेफ्टी किट मोफत वाटप करण्यात येणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ