मतदान स्वयंसेवक जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मानित


         अकोला,दि.29(जिमाका)- लोकसभा निवडणूकीत ज्या शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींनी मतदान स्वयंसेवक म्हणून कामगिरी केली त्यांना आज जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याहस्ते सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या स्वयंसेवकांनी व विद्यार्थ्यांनी  आगामी विधानसभा निवडणूकीतही स्वयंसेवक म्हणून कर्तव्य बजावण्याची प्रतिज्ञा यावेळी घेतली.
येथील प्रभात किड्स स्कूल येथे हा कार्यक्रम आज पार पडला. यावेळी निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी राजेश खवले, जिल्हा क्रीडा अधिकारी  आसाराम जाधव, डॉ. गजानन नारे, वंदना नारे तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक आदी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थी विद्यार्थिनींना जिल्हाधिकारी पापळकर यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.  तसेच त्यांनी सामुहिकरित्या प्रतिज्ञा घेतली. यावेळी जिल्हाधिकारी पापळकर यांनी विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून केलेल्या कामाचे कौतूक केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ